जनतेचे प्रश्न सोडविणे हीच प्राथमिकता- राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत राज्यमंत्री पदाचा स्वीकारला कार्यभार

मुंबई दि. 14 : राज्यमंत्री म्हणून आज पदभार स्वीकारला असून राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविणे हीच प्राथमिकता असणार आहे असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले.

राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,वैद्यकीय शिक्षण, अन्न औषध प्रशासन,वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री  म्हणून कार्यभार स्वीकारला.

विधानभवनातील दुसरा मजला, दालन क्र.२१४ ब हे राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे कार्यालय असणार आहे. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/14.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.