तृतीयपंथीय कल्याण मंडळाची लवकरच स्थापना - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 7 : राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले तृतीयपंथीय कल्याण मंडळ शासन निर्णय होऊनही प्रलंबित आहे. हे मंडळ तात्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री.पवार बोलत होते.

श्री.पवार म्हणाले, तृतीयपंथीय समाज घटकांची सर्वांगीण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जावे, तसेच या समाजघटकांच्या समस्या बहुतांश विभिन्न स्वरुपाच्या असल्यामुळे शासनाचे विविध विभाग व या क्षेत्रातील कार्यरत तज्ज्ञ व्यक्तींचे मिळून त्यांच्या विकासाकरिता तृतीयपंथीय कल्याण मंडळ रुपाने स्वतंत्र कल्याणकारी उपाययोजनात्मक यंत्रणा निर्माण केली जाईल. या मंडळामार्फत तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणला जाईल.

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी या मंडळामार्फत मराठी भाषेत हेल्पलाईन सुरु करण्यात येईल. त्यांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करण्यासाठी या कल्याण मंडळामार्फत प्रयत्न केले जाणार असल्याचेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, तृतीयपंथीय शिष्टमंडळाच्या गौरी सावंत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितिन गद्रे, दिव्यांग कल्याण आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००
दत्तात्रय कोकरे/विसंअ/7.1.2020

तृतीयपंथीय कल्याण मंडल की जल्द ही स्थापना
- अजित पवार
मुंबई : राज्य में तृतीयपंथीयों के लिए काम करनेवाले विशेषज्ञों का समावेश कर तृतीयपंथीय कल्याण मंडल करने का सरकारी निर्णय होकर भी प्रलंबित है. यह  मंडल तत्काल अस्तित्व में लाने के निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार ने आज यहां दिए.
तृतीयपंथीयों के विविध प्रश्नों के संदर्भ में आज मंत्रालय में आयोजित बैठक में श्री.पवार बोल रहे थे.
श्री.पवार ने कहा, तृतीयपंथीय समाज घटकों की सर्वांगीण उन्नति होने और उन्हें समाज के मुख्य प्रवाह में लाना जरूरी है. साथ ही इस समाज घटक की समस्याएं अधिकांश विभिन्न स्वरूप की है.  इसलिए सरकार के विविध विभाग और इस क्षेत्र में कार्यरत विशेषज्ञ व्यक्तियों को लेकर उनके विकास के लिए तृतीयपंथीय कल्याण मंडल के रूप में स्वतंत्र कल्याणकारी उपाययोजनात्मक यंत्रणा निर्माण की जाएगी. इस मंडल के मार्फत तृतीयपंथीयों को सरकार की विभिन्न योजनाओं का लाभ दिलाकर उनका आर्थिक एवं सांस्कृतिक विकास किया जाएगा.
तृतीयपंथीयों की समस्या छुड़ाने के लिए इस मंडल की ओर से मराठी भाषा में हेल्पलाइन शुरू की जाएगी. उनका समाजिक, शैक्षणिक और आर्थिक विकास करने के लिए इस कल्याण मंडल के मार्फ़त प्रयास किए जाएंगे, ऐसा श्री.पवार ने इस समय बताया.
इस अवसर पर सामाजिक न्याय एवं विशेष सहायता मंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक स्वास्थ मंत्री राजेश टोपे, सांसद सुप्रिया सुळे, तृतीयपंथी प्रतिनिधि मंडल की गौरी सावंत, सामाजिक न्याय एवं विशेष सहायता विभाग के प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वित्त विभाग के प्रधान सचिव नितिन गद्रे, दिव्यांग कल्याण आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार के साथ विभिन्न विभागों के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे. 

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.