'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या कवयित्री नीरजा यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात कवयित्री नीरजा यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार, दि. 16 जानेवारी आणि शुक्रवार दि. 17 जानेवारी रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कवयित्री नीरजा यांची आजवरची साहित्यिक वाटचाल, त्यांनी लिहिलेली विविध पुस्तके, कथालेखन,  मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे यासाठीचे प्रयत्न, आजच्या पिढीचा साहित्यविषयक दृष्टिकोन, मराठी भाषेची आधुनिक तंत्रज्ञानाशी घालण्यात येणारी सांगड आदी विषयांची माहिती श्रीमती निरजा यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.