ई आर १ विवरणपत्र ३० जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


      
मुंबई, दि. 6 : सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती देणारे त्रैमासिक ई आर 1 विवरणपत्र 30 जानेवारीपर्यंत www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.

सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करणे) कायदा 1959 आणि नियम 1960 च्या कलम 5 (1) नुसार, दर तीन महिन्यांनी 30 दिवसांच्या आत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील कार्यालयांनी कार्यरत स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या आणि आवश्यक माहितीचे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील अद्ययावत करावा, असे आवाहन जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.