महापरिनिर्वाणदिनी 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर- द अनटोल्ड ट्रुथ' या चित्रपटाचे प्रसारण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 2 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या समाज जीवनावर प्रकाश टाकणारा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर- द अनटोल्ड ट्रुथ' (Dr.Babasaheb Ambedkar -The Untold Truth) या चित्रपटाचे प्रसारण दूरदर्शन केंद्रातर्फे सह्याद्री वाहिनीवर करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे प्रसारण ६ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता करण्यात येणार असल्याची माहिती दूरदर्शनचे सहायक संचालक संदीप सूद यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.