वाहनांना ऑनलाईन प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र धारण करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 31 : केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांना दिनांक 1 एप्रिल 2019 पासून ऑनलाईन प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार वाहनांना ऑनलाईन पीयूसी धारण करण्याचे आवाहन मुंबई (मध्य)च्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

प्राधिकृत प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्राची माहिती केंद्र शासनाच्या          https://vahan.parivahan.gov.in/puc/views/PUCCenterList.xhtml 

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या मान्यतेनुसार प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) जारी करून घेण्यासाठी दुचाकी वाहनास 35 रुपये, पेट्रोलवरील तीन चाकी वाहनास 70 रुपये, पेट्रोल/ सीएनजी/ एलपीजीवर चालणारी चार चाकी वाहने 90 रुपये तर डिझेलवर चालणारी वाहने 110 रुपये केंद्र धारकांना देण्यात यावे.

 केंद्र शासनाच्या दिनांक 6 जून 2017 च्या अधिसूचनेनुसार भारत स्टेज IV वाहनांसाठी एक वर्षाची वैधता तर त्या पूर्वीच्या वाहनांना सहा महिन्यांची वैधता देण्यात येत आहे. त्यानुसार आपल्या परिक्षेत्रातील अधिकृत पीयूसी केंद्राकडून आपल्या वाहनांच्या नोंदणी पुस्तकावरील नोंद असलेल्या मानांकानुसार वैध पीयूसी प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले आहे. वाहनांची नोंद www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जाऊन आपल्या वाहनांची संगणकीय नोंद करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

मालवाहतूकदारांनी 'कॉमन कॅरिअर' म्हणून नोंदणी प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 31 : माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकीटे/ मालाची घरपोहोच वाहतूक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यवसायिक यांना कॉमन कॅरिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे, असे मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

कॅरेज बाय रोड अधिनियम, 2007 च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार कॅरेज बाय रोड नियम, 2011 प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे नियम अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या दिनांकापासून लागू झाले आहेत. हे नियम केंद्र शासनाच्या www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उपरोक्त सर्व संबंधितांनी मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे संपर्क साधून हे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. अन्यथा मोटार वाहन अधिनियम तसेच नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी मरोळ प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. 2 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 वाजता मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांचे विशेष संचलन होणार असून इतर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

58 वर्षापूर्वी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना एका सोहळ्यात पोलीस ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून महाराष्ट्र पोलिसांना विशेष दर्जा मिळाला. त्यानिमित्त दर वर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. येत्या 2 जानेवारी रोजी मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानात पोलिसांचे विशेष संचलन होणार आहे. या संचलनात सुमारे 250 पोलीस सहभागी होणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त हर्ष फायरचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे. तसेच यावेळी पोलिसांच्या 200 जणांचा सहभाग असलेल्या बँड पथकाचे सादरीकरण होणार आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे होते, याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/31.12.2019

सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई दि. 31 : सैन्य दलातील शौर्यासाठी पारितोषिके देण्यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र गौरव पुरस्काराने चार वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.  यामध्ये एअर मार्शल हेमंत नारायण भागवत, ले.जनरल अशोक आंब्रे, ले.कर्नल राजेश हंकारे, ले.कर्नल शशिकांत वाघमोडे यांचा समावेश आहे.

एअर मार्शल हेमंत नारायण भागवत आणि ले. जनरल अशोक आंब्रे यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार 'परम विशिष्ट सेवा पदक' हे प्रदान करण्यात आले आहे. दोघांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के म्हणजे 2 लाख रुपये शासकीय अनुदानातून तर उर्वरित 50 टक्के म्हणजेच 2 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.

ले. कर्नल राजेश विलास हंकारे यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार 'मेन्शन इन डिस्पॅच पदक' हे प्रदान करण्यात आले आहे. ले. कर्नल राजेश विलास हंकारे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले  2 लाख 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 75 टक्के म्हणजे 2 लाख 6 हजार 250 रुपये शासकीय अनुदानातून तर उर्वरित 25 टक्के म्हणजेच 68 हजार 750 रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.

ले. कर्नल शशिकांत वाघमोडे यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार 'सेना पदक' हे प्रदान करण्यात आले आहे. ले. कर्नल राजेश विलास हंकारे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले  1 लाख 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के म्हणजे 75 हजार रुपये शासकीय अनुदानातून तर उर्वरित 50 टक्के म्हणजेच 75 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.

वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात प्रथम; ९७५ चौ.कि.मी. ची वाढ

1 टिप्पणीमुंबई दि. ३१ : केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार महाराष्ट्राचे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन २०१७ च्या तुलनेत ९८३१ चौ.कि.मी हून वाढून २०१९ मध्ये १०,८०६ चौ.कि.मी इतके झाले आहे. ही वाढ ९७५ चौ.कि.मी आहे. वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या वनाच्छादनात सुद्धा ९६ चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली आहे.

देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दर दोन वर्षांनी  प्रसिद्ध होतो. २०१७ ते २०१९ मधील वनस्थिती अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

कांदळवन क्षेत्रात १६ चौ.कि.मी ची वाढ

याच अहवालात राज्यातील कांदळवनक्षेत्रात १६.२७ चौ.कि.मी ची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.  ही वाढ प्रामुख्याने रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र यात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय वन सर्वेक्षण अहवालात २०१४ ते २०१९ या कालावधीत १,४७,८१४ हेक्टर क्षेत्र नव्याने राखीव वन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्राचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. पर्यावरण समतोल आणि संरक्षणाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भरीव कामगिरीची दखल या अहवालात घेण्यात आली आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल

महाराष्ट्राने वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी उपयोगात आणलेल्या माहिती तंत्रज्ञान सुविधांचा अहवालात आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. माय प्लँट ॲप, महाराष्ट्र हरित सेना, हॅलो फॉरेस्ट १९२६ आणि वनीकरणासाठी विविध घटकांचा सहभाग यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दलची विशेष दखल अहवालात विशेषत्वाने घेण्यात आली आहे.

असा होता महिना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


डिसेंबर महिन्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा 

·      मुंबई येथील विधानमंडळाच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे अभिभाषण. राज्य शासनाची सध्याची आर्थिक स्थिती दर्शविणारा वस्तुस्थितीदर्शक अहवाल जनतेसमोर मांडणार असल्याचे व ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व आर्थिक शिस्त आणण्यासाठी वचनबद्ध असल्याचे विवेचन.

·      माजी सैनिक कल्याण विभागाच्यावतीने सह्याद्री अतिथीगृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ.

·      ऑल इंडिया एमएसएमई असोसिएशनचा वर्धापन दिन संपन्न.

·      राजभवन येथे  विद्यापीठांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक. महाराष्ट्रातील विद्यापीठातील कामांमध्ये सुसुत्रता यावी यासाठी तयार करण्यात येत असलेल्या इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली’ (IUMS) मध्ये विद्यापीठांनी सहभागी होण्याचे निर्देश.

·      गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमातील सेंट्रल बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन (सीबीएसई) पॅटर्नच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेला भेट.

·      गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे उमेद; महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून उडान सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन.

·      नागपूर येथील राजभवन येथे विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या अध्यक्षांसमवेत बैठक

·      आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे येथे उद्घाटन

·      अमरावती येथे संत गाडगेबाबा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन

·      संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 36 वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

·      मुंबई येथे केंद्रीय अल्पसंख्याक आयोगामार्फत आयोजित हुनर हाटया उपक्रमाचे उद्घाटन.

·      बोरिवली (मुंबई) येथील प्रमोद महाजन स्पोर्टस क्लब येथे मुंबई - उत्तराखंड महोत्सवाचे उद्घाटन.

·      बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 50 शाळांना योग शिक्षण देण्याच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमास उपस्थिती.


मुख्यमंत्री 
(श्री.उद्धव ठाकरे) 


·      राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून श्री.उद्धव ठाकरे यांना राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून शपथ. शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी समारंभात 6 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली.

·      सह्याद्री अतिथीगृह येथे नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक

·      मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. ठाकरे यांच्याद्वारे रायगड संवर्धन आणि परिसर विकासासाठी 20 कोटी रुपये निधी वितरणाचा पहिला निर्णय.

·      मंत्रालयात पदभार स्वीकारला.

·      सर्व सचिवांसमवेत पहिली बैठक.

·      ‘हे माझं सरकारअशी भावना जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे  सचिवांना निर्देश

·      मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार संघाच्या कक्षाला पहिली भेट.

·      आरे कारशेडच्या कामांना स्थगिती. आढाव्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुतोवाच.

·      नवीन मंत्रिमंडळाचा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी संमत.

·      मुंबईमध्ये बॅकाँक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे संबंधित विभागास निर्देश.

·      मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृध्दी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा मंत्रालयात आढावा. सुरु असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देश.

·      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याची घोषणा. बाबासाहेबांच्या, परळ येथील दामोदर हॉल जवळील बीआयटी चाळ येथील खोलीस भेट.

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन.

·      महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय. पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

·      राज्य शासनाच्या स्टेट डेटा सेंटरच्या सर्व्हरचे उद्घाटन. क्लाऊडवरील शासनाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही बाह्य प्रणालीद्वारे सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी या केंद्राची स्थापना.

·      महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वश्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक.

·      कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याबाबत राज्यपालांना विनंती.

·      सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा मंत्रालयात आढावा; राज्य व प्रमुख जिल्हा मार्गांची कामे, मुंबई-पुणे महामार्गावरील नवीन टनेल मार्ग, हायब्रीड ॲन्युइटी योजना, शासकीय इमारती, मंत्रालयाचे आधुनिकीकरण, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, वांद्रे वर्सोवा सी लिंक, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हरित इमारत प्रकल्प यांची माहिती जाणून घेतली.

·      आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा; आदिवासी जिल्ह्यातील मुलांना न्यूमोनियाच्या लसीकरणासाठी तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश.

·      महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट ऑफ डायजेस्टीव्ह सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या एन्डोस्कोपी ऑन व्हिल्सचे (फिरत्या पोटविकार केंद्राचे) विधानभवनात उद्घाटन. पद्मश्री डॉ.अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे भारतातील पहिलेच केंद्र आहे.

·      राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पोलीस मुख्यालयात बैठक.

·      निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश.

·      धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावास मान्यता.

·      ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची भेट.

·      किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.

·      ग्रेट ब्रिटनमधील 'व्हर्जिन' उद्योग समुहाचे प्रमुख सर रिचर्ड ब्रॅन्सन यांची सदिच्छा भेट.

·      वस्तू व सेवा कर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची 15 हजार 558 कोटी 5 लाख रुपये रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी अशी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांना विनंती.

·      प्रायोगिक स्तरावर मुख्यमंत्री सचिवालयाची कार्यालये विभागीय पातळीवर सुरु करणार.

·      विदर्भात अन्नप्रक्रिया उद्योग क्लस्टर उभारणार.·      मंत्रिमंडळाचे खातेवाटप

1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री : कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.

2. श्री. एकनाथ संभाजी  शिंदे :   गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.

3. श्री. छगन चंद्रकांत भुजबळ :  ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.

4. श्री. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात : महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.

5. श्री. सुभाष राजाराम देसाई : उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.

6. श्री. जयंत राजाराम पाटील : वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

7. डॉ. नितीन काशिनाथ राऊत :  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

·      निळवंडे धरणाचे काम येत्या जून अखेर पूर्ण करण्यासाठी कालबद्ध पध्दतीने काम करण्याचे निर्देश.

·      हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा­', जलाशयातून वीज निर्मिती करण्यासाठी मंजुरी.

·      रामगिरी (नागपूर) येथे मंत्रिमंडळ बैठक

·      रामगिरी येथे पत्रकार परिषद ; शेतकरी कर्जमुक्तीसोबत चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे सुतोवाच.

·      पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या (पीएमसी) खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्यशासनाकडून योग्य कार्यवाही करण्याचे सुतोवाच.

·      अमरावती जिल्ह्यातील विकासकामांचा विधानभवनात आढावा ; लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून योजनांमध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचे सुतोवाच.

·      यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा; जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी प्राधान्याने निधी देण्याचे सुतोवाच.

·      विधानभवन (नागपूर) येथे चंद्रपूर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा.

·      विधानभवन (नागपूर)येथे गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा. सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्पाला चालना देण्याचे निर्देश.

·      अकोला (शिवणी) विमानतळासोबत राज्यातील इतर विमानतळाच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधितांची बैठक घेवून विमानतळांना सर्व सुविधा पुरविणार असल्याचे विधानपरिषदेत सुतोवाच.

·      नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याची, विधानपरिषदेत घोषणा.

·      भरती प्रक्रियेसाठी महापोर्टलची क्षमता वाढविणार असल्याचे विधानपरिषदेत सुतोवाच.

·      अकोला जिल्ह्याच्या विकासकामांचा नागपूर येथे आढावा. खारपाण पट्टा क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा धोरण तयार करण्याचे निर्देश

·      वाशिम जिल्ह्याच्या विकासाबाबत आढावा बैठक. जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्याचे सुतोवाच.

·      राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर. कमी बोलून जास्त काम करण्याचा निर्धार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितोया ओव्यांच्या आधारावर सरकार वाटचाल करेल ही बाब स्पष्ट.

·      नागपूर येथे भंडारा जिल्हा विकासकामांची आढावा बैठक, भंडारा शहरास पिण्याचे शुध्द पाणी पुरवठा करण्याचे निर्देश.

·      गोंदिया जिल्ह्याच्या विकासकामांचा नागपूर येथे आढावा ; गोसेखुर्दच्या धर्तीवर धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे काम करण्याचे सुतोवाच.

·      विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तत्काळ मदतीसाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी निर्देश देण्याचे त्यांना आवाहन, विमा कंपन्यांनी निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न दिल्याने रब्बी हंगाम 2019 साठी या कंपन्यांच्या निवडीची अंतिम मुदत 15 जानेवारी 2020 पर्यंत वाढविण्याची विनंती.

·      नागपूर येथे दीक्षाभूमीला भेट.

·      नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला शासन धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही.

·      नागपूर येथे बुलढाणा जिल्हा विकासकामांचा आढावा, जिगांव प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश.

·      शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची विधिमंडळात घोषणा.

·      नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका, राज्यात शांततेचे वातावरण ठेवा,असे आवाहन.

·      मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; पंतप्रधानांना पत्र.

·      कर्जमुक्तीबद्दल राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या वतीने सत्कार.

·      मांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेची 43  वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपस्थित.

·      मुंबई येथे आदिवासी विकास विभागाचा आढावा. आदिवासी विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वॉर रूमची स्थापना करण्याचे निर्देश.

·      केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या एनडीएच्या परीक्षेमध्ये देशात 16 वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकवलेल्या पियुष नामदेव थोरवे यांचा सत्कार.

·      बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात  सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक. केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त. अवैध फलकांवर कारवाईचे निर्देश. मुंबईत हवा प्रदुषणाबरोबरच दृष्यमानताही कमी होत असल्याने यावर उपाय योजण्याची अधिकाऱ्यांना सूचना. उत्कृष्ट काम करणाऱ्या सहायक आयुक्तांचा गौरव करण्याचे निर्देश.

·      मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते वाहतुकीसाठी सुलभ, सुरक्षित आणि पादचारी उपयोगासाठी सुसह्य व्हावेत यासाठी महापालिकेमार्फत ब्लुमर्ग फिलाँन्थ्रॉपीस्ट आणि डब्लुआरआय इंडिया यांच्या सहकार्याने 'मुंबई स्ट्रिट लॅब" स्पर्धेचे आयोजन. या स्पर्धेतील पाच रस्त्यांच्या आराखड्यांची पाहणी.

·      पुणे मेट्रो कोचचे, मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात अनावरण

·      ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार वसंत सबनीस यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन आणि कुटुंबीयांचे सांत्वन.

·      राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्याद्वारे श्री. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर 25 सदस्यांना कॅबिनेट मंत्री पदाची आणि 10 सदस्यांना राज्यमंत्री पदाची शपथ. अशोक चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, विजय वड्डेटीवार, अनील देशमुख, हसन मुश्रीफ, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ.राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, सुनिल केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अमित देशमुख, दादाजी भुसे, जितेंद्र आव्हाड, संदिपान भुमरे, बाळासाहेब पाटील, ॲड. यशोमती ठाकूर, सर्वश्री ॲड.अनिल परब, उदय सामंत, ॲड.के.सी. पाडवी, शंकरराव गडाख, अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांचा मंत्री म्हणून समावेश. अब्दुल सत्तार, सतेज ऊर्फ बंटी पाटील, शंभूराज देसाई, बच्चू कडू, डॉ.विश्वजित कदम, दत्तात्रय भरणे, श्रीमती अदिती तटकरे, सर्वश्री संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश.

·       मंत्रालयात पहिली मंत्रीपरिषद संपन्न. जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते राज्य मंत्रिमंडळात असून ही एक बेस्ट टीम असल्याची भावना व्यक्त.

·      भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 334 मधील अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 8 जानेवारी 2020 रोजी घेण्याचा निर्णय.

·      महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र. 117 च्या दीक्षांत संचलन कार्यक्रमास उपस्थित.

·      नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे इनडोअर फायरिंग रेंज, ॲस्ट्रोटर्फ हॉकी व फुटबॉल मैदान तसेच आवेल मैदानातील सिन्थेटिक ट्रॅकचे भूमिपूजन.मंत्रिमंडळ निर्णय

(11 डिसेंबर 2019) 

·      दुय्यम न्यायालयातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता.

·      महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.

·      महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देणार.

·      महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी विविध वित्तीय संस्था तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे लि. यांच्या दरम्यान करण्यात आलेल्या वित्तीय करारांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारणीस सूट देणार.

(24 डिसेंबर 2019)

·      महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मान्यता. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या, एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम 2 लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार.

·      राज्यातील गरीब व गरजू जनतेला 10 रुपयात शिवभोजनउपलब्ध करुन देण्यास मान्यता. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय तसेच प्रत्येक भोजनालयात कमाल 500 थाळी सुरु करणार.इतर मंत्री

·      आपद्ग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केल्याची अर्थमंत्री श्री. जयंत पाटील यांची  विधानसभेत माहिती.

·      महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशासारखा कायदा करण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे गृहमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे विधानपरिषदेत सुतोवाच.

·      गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाचे चुकारे देण्यासाठी 13 कोटी 80 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्याची कार्यवाही सुरू असून कोकणातील धान खरेदीचे चुकारे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात येत असल्याची, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची विधानपरिषदेत माहिती.

·      मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या मेट्रो मार्ग 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) च्या मार्गिकेलगतच्या जागेवरील बांधकामासाठी एमएमआरडीएचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणाची चौकशी, पंधरा दिवसात करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिल्याचे नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे विधानपरिषदेत सुतोवाच.

·      शाळांना प्रतीविद्यार्थी वेतन, अनुदान व इतर मुद्यांबाबत अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी नेमलेले 33 अभ्यासगट रद्द करण्यात येत असल्याची शालेय शिक्षण मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांची विधानपरिषदेत घोषणा.

·      एलईडी दिवे व पर्ससिन नेटद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 मध्ये काळानुरुप बदल करण्याची, पशुसंवर्धन मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांची विधानपरिषदेत घोषणा. वादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना मदतीसाठी 5 कोटी रुपयांचे तातडीने वितरण.

·      महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दि. 11 नोव्हेंबर 2019 रोजी वाढविलेल्या सेवा शुल्क आदेशास स्थगिती देण्यात येऊन यासंदर्भात फेरविचार करण्याची उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांची विधानपरिषद व विधानसभेत घोषणा.

·      राज्यपालांच्या अभिभाषणावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे विधानपरिषदेत निवेदन.

रोजगार निर्मितीवर भरविकासप्रकल्पांना स्थगिती नाही, दहा लाख लोकांना एकाच वेळी दहा रुपयात रोज जेवण या आणि इतर बाबींचे सुतोवाच

·      अपूर्ण एसआरए (झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण) प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार असल्याचे अर्थमंत्री श्री.जयंत पाटील यांची विधानपरिषदेत घोषणा

·      अवैध सावकारीविरूद्ध कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाईच्या शिफारशीसाठी समिती नेमण्याची सहकार मंत्री श्री. जयंत पाटील यांची घोषणा

·      राज्यातील डम्पिंग ग्राऊंड प्रश्नी समिती नेमण्याची नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत घोषणा

·      दीक्षाभूमीच्या विकासासाठी मंजूर 100 कोटींपैकी 40 कोटी रूपये नागपूर प्राधिकरणाकडे सुरक्षित असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली.

·      मान्यता प्राप्त व अनुदानीत खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय यातील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबिंयाना कॅशलेस आरोग्य योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांचे सुतोवाच

·      विदर्भ व कोकणातील रोजगारसंधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार असल्याचे उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई यांचे विधानपरिषदेत सुतोवाच.

·      कायम विना अनुदानित शाळांच्या अनुदानासाठी प्रचलित धोरण राबविण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांचे विधानपरिषदेत सूतोवाच.

·      आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी बृहदआराखडा तयार केला जाईल. अनुसूचित जाती व जमातीसाठींच्या योजनांवर केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध होणारा निधी शंभर टक्के खर्च व्हावा म्हणून कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या धर्तीवर कायदा करणार असल्याचे, आदिवासी विकास मंत्री डॉ.नितिन राऊत यांचे विधानपरिषदेत प्रतिपादन.

·      वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक असल्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे विधानपरिषदेत प्रतिपादन.

·      गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती स्थापन करण्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. जयंत पाटील यांचे सुतोवाच.

·      रायगड जिल्ह्यातील आरोग्य योजनेच्या अनियमिततेची विभागामार्फत चौकशी करण्याची आरोग्य मंत्री श्री.जयंत पाटील यांची विधानपरिषदेत घोषणा.

·      शिरवळ ते बारामती रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे बांधकाम मंत्री डॉ.नितिन राऊत यांचे विधानपरिषदेत प्रतिपादन.

·      गृहनिर्माण मंत्री श्री जयंत पाटील यांच्याकडून झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा.

·      गृहमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विधि व न्याय विभाग आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याबाबत अभ्यास करण्याचे श्री शिंदे यांचे संबंधितांना निर्देश. 

इतर

·      महिला सुरक्षेच्या विविध योजनांतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला 195 कोटी 54 लाख 30 हजारांच्या निधीचे वितरण.

·      सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधिमंडळात पारित.

·      14 व्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून श्री. नाना फाल्गुनराव पटोले यांची बिनविरोध निवड

·      नागपूरच्या हैद्राबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष कार्यान्वित.

·      प्रसिद्ध मराठी कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजून हीया काव्यसंग्रहास 2019 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

·      प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील बिटगावचे सरपंच श्री. प्रकाश पेंधे आणि नंदूरबार जिल्ह्यातील भादवड गावचे ग्रामसेवक श्री. अशोक सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव.

·      महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गंत (मनरेगा) जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला तिसरा क्रमांक.

·      महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2019 अंतर्गत तीन हजार कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची विक्री

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी निवासस्थानाचे वाटप. मुख्यमंत्री-वर्षा, ग्रामविकास मंत्री श्री. छगन भुजबळ-रामटेक, वित्त मंत्री श्री. जयंत पाटील-सेवासदन, गृह मंत्री श्री. एकनाथ शिंदे - रॉयलस्टोन, बांधकाम मंत्री, डॉ.नितीन राऊत-पर्णकुटी, विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस सागर, विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले चित्रकुट.

·      बुलढाणा जिल्ह्याकरिता शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा आणि अमरावती जिल्ह्याकरिता ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव श्री. असिमकुमार गुप्ता यांची पालक सचिव म्हणून नियुक्ती.

·      ज्येष्ठ रंगकर्मी, विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

·      दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानांतर्गत 'उमेद' अभियानाच्या कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत (मनरेगा), जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला राष्ट्रीय पुरस्कार

·      शिंदखेडा तालुक्यातील दोंडाई ते निमगूळ एसटी बस अपघातातील मयत प्रवाशांच्या वारसांना रूपये दहा लाख प्रमाणे 11 प्रकरणी एकूण 1 कोटी रुपये व एसटी चालकास 7 लाख 18 हजार 960 रूपये तसेच जखमी प्रवाशांना 23 हजार तात्कालीक आर्थिक मदत व नुकसान भरपाई.

·      नागपूर येथे 14 व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन संस्थगित.

·      66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात भोंगाचित्रपटाला सर्वोत्तम मराठी  चित्रपटाचा पुरस्कार प्रदान. मराठी चित्रपटांना विविध श्रेणीत 10 पुरस्कार.

·      राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्यावतिने विविध सामाजिक घटकांच्या एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या स्मार्टकार्डयोजनेला 1 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा महामंडळाचा निर्णय.

·      आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 50 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द.


०००००


नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 31 : नवीन वर्षाचे स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करुया असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, एकविसाव्या शतकातील पहिली 19 वर्षे कशी गेली, कोणत्या गोष्टी साध्य झाल्या अन्‌ कोणत्या राहिल्या हे बाजूला ठेवूया आणि महाराष्ट्राला आनंदी, सुखी-समाधानी बनविण्यासाठी प्रयत्न करूयात. येणारे वर्ष महाराष्ट्रासाठी नवीन आशा, आकांक्षा आणि नवी उमेद घेऊन आले असून सर्वांनी मिळून आपल्या राज्याला आणखी पुढे नेऊया. राज्याला प्रगतीपथावर नेताना गोरगरीब आणि दुर्बल लोकांना हाताला धरून पुढे नेऊया. पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच शेतकरी, कामगार, रोजीरोटी कमावणारा मजूर आनंदी होण्यासाठी प्रयत्न करुया. महिला, मुलं सुरक्षित आणि समाधानी असण्याबरोबरच प्रत्येकाच्या हाताला रोजगार, जगातले सर्वोत्तम शिक्षण, सर्वांना परवडणारे आणि सहज उपलब्ध होणारे आरोग्य देण्यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करूया.
00000

नव वर्ष के अवसर पर सीएम ने
राज्य की जनता को दीं शुभकामनाएं

मुंबई, दिनांक 31 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने राज्य की जनता को नए साल की शुभकामनाएं देते हुए कहा है कि हम सभी लोग नए साल का स्वागत आनंद और उत्साह के साथ करें।

अपने संदेश में मुख्यमंत्री कहते हैं कि इक्कीसवीं सदी का पहला 19 साल कैसे गुजर गया है, इसमें क्या हासिल हुआ है और क्या छूट गया है। उसे पीछे छोड़कर हमें महाराष्ट्र को खुशहाल, सुखी और समाधानी बनाने का प्रयास करना चाहिए। आने वाला वर्ष महाराष्ट्र के लिए नई आशाएं, आकांक्षाएं और नई उम्मीद लेकर आया है और हम सभी  को मिलकर अपने राज्य को और आगे लेकर जाना हैं। राज्य को प्रगति के पथ पर ले जाते समय हमें गरीब और कमजोर लोगों के हाथों को पकड़ कर आगे लेकर जाएं।  बुनियादी ढाँचे के विकास के साथ-साथ, किसानों, श्रमिकों, रोजी-रोटी कमाकर जीवन निर्वाह करने वाले मजदूरों को खुशी प्रदान करने का प्रयास करें। महिलाओं और बच्चों को सुरक्षित और संतुष्ट रखने के साथ-साथ सभी को रोज़गार प्रदान करने के लिए, दुनिया में सबसे अच्छी शिक्षा, सभी को सस्ता और सहजता से उपलब्ध होने वाली स्वास्थ्य व्यवस्था प्रदान करने के लिए अच्छी व्यवस्था करें।
००००


On the occasion of New Year,
CM wishes the people of the state

Mumbai, Date 31: Chief Minister Uddhav Thackeray, while wishing the people of the state a happy new year, has said that we all should welcome the new year with joy and enthusiasm.

In his message, the Chief Minister said that how the first 19 years of the twenty-first century have passed, what has been achieved and what is left in it. Leave it behind. We should try to make Maharashtra happy and prosperous. The coming year has brought new hopes and aspirations for Maharashtra and we all have to take our state further. While taking the state on the path of progress, we should hold the hands of poor and weak people. Along with the development of infrastructure, try to provide happiness to the farmers, laborers and the persons, who earn their livelihood. Evolve a good arrangements to keep women and children safe and satisfied. Besides this, provide employment to all, avail the best education in the world to all and affordable and readily available healthcare to all.
0000

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचे अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 31 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनासन २०१८-१९ या सालासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी विम्याचा लाभ द्यावा, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

विधानभवनात आज अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत समस्यांचे निराकरण करण्यासाठी  विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनीही यासंदर्भात अधिक माहिती दिली.

श्री. पटोले म्हणाले, पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अधिक जागृती निर्माण करावयाची गरज असून, संबंधित विभागाने त्यासंदर्भात कारवाई करावी. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना रब्बी हंगाम २०१८ अंबिया व मृगबहाराची नुकसान भरपाई जास्तीत जास्त शेतक-यांना देण्यात यावी. तसेच जे शेतकरी पाहणी न झाल्याने आणि कमी तापमान या निकषावर नुकसान भरपाईपासून वंचित राहिले अशा शेतकऱ्यांनाही न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने पीक विम्याची भरपाई द्यावी, असे निर्देश श्री. पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी भविष्यात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीस विस्तार व प्रशिक्षण मंडळाचे संचालक एन.टी.शिदोळे, मुख्य सांख्यिकी उदय देशमुख, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अशोक मानकर, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते.
०००
श्रद्धा मेश्राम/31.12.19

नूतन वर्षानिमित्त राज्यपालांकडून जनतेला शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 31 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी 2020 हे वर्ष सर्वांना सुख, समाधान आणि भरभराटीचे जावो. आपले राज्य तसेच आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीच्या वाटेवर निरंतर अग्रेसर राहो. 2020 या नवीन वर्षासाठी मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.  
0000


Governor wishes people Happy New Year 2020

Mumbai Dated 31 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has extended his greetings to all on the occasion of the New Year 2020.

In his greetings, the Governor has said, “Wishing all a Happy New Year 2020. May the New Year bring happiness, peace and prosperity to the people. May our State and our Nation continue to march on the path of progress and development.”

००००

सक्षम समाज घडविण्यासाठी समर्थपणे कर्तव्य बजावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी सत्र क्रमांक 117 चा दीक्षान्त समारंभ संपन्न

 नाशिक दि.30 - सक्षम समाज घडविण्यासाठी समर्थपणे आपले कर्तव्य बजवावे. कठोर मेहनतीनंतर मिळालेल्या वर्दीला भ्रष्टाचारमुक्त ठेवत चारित्र्यावर कुठलाही कलंक लागू नये याची दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले.

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.117 च्या दीक्षान्त संचलन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालिका अश्वती दोरजे आदी उपस्थित होते.श्री.ठाकरे म्हणाले, प्रशिक्षणानंतर प्रत्येक पोलीस उपनिरीक्षक आव्हाने स्वीकारण्यास आणि त्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशासोबत मिळालेली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी सदैव तत्पर राहून आपल्या वरिष्ठांनी आणि यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन पोलीस दलाची मान उंचावली आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक ही कर्तव्य व सेवेची परंपरा नेतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी  व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, वर्दीच्या आतला माणूस मजबूत करण्यासाठी पोलिसांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ व निरोगी राहणे आवश्यक आहे. यासाठी शासन आवश्यक ती सर्व मदत करेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दल सक्षम करण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञान, वाहने, प्रशिक्षण अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासनामार्फत प्रयत्न करण्यात येईल. संघटीत गुन्हेगारी, नक्षलवाद, सायबर गुन्हे अशा आव्हानांना पेलण्याची प्रेरणा मिळावी म्हणून पुढील वर्षी मानाच्या तलवारी सोबतच 'मानाची रिव्हॉल्वर' हा पुरस्कार म्हणून देण्यात येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 117 या  तुकडीचे प्रशिक्षण हे 22 ऑक्टोबर 2018 पासून सुरु झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील 477 पुरुष व 192 महिला व गोवा राज्यातील 20 पुरुष असे एकूण 689 प्रशिक्षणार्थींनी  प्रशिक्षण पूर्ण करुन ते आज पोलीस सेवेत रुजू होत आहेत. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव संस्था असून 1 जुलै 1906 रोजी भांबुर्डा, पुणे येथे सुरु झालेली प्रशिक्षण शाळा 1 जुलै 1909 रोजी नाशिक येथे स्थलांतरित करण्यात आली असून 5 फेब्रुवारी 1990 रोजी या शाळेला महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती श्रीमती दोरजे यांनी यावेळी बोलताना दिली.  त्यांनी प्रशिक्षणार्थींना संविधानाची शपथ दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण संचलनाचे निरीक्षण केले.  संचलन सुरु करण्यापूर्वी राष्ट्रध्वज व महाराष्ट्र पोलीस प्रबोधनीच्या ध्वज घेऊन जाणाऱ्या निशाण टोळीला सर्व उपस्थितींना मानवंदना दिली.  संचलनाचे नेतृत्व संतोष कामटे आणि विजया पवार यांनी केले.मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. संतोष कामटे यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (स्वॉर्ड ऑफ ऑनर) व  बेस्ट कॅडेट इनडोर स्डडीज (सिल्व्हर बॅटन) ने सन्मानित करण्यात आले. अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑल राऊंड वुमन कॅडेट व सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच विजया पवार, बेस्ट कॅडेट इन आऊट डोअर (गोल्ड कप) सागर साबळे यांना प्रदान करण्यात आला.

दीक्षान्त संचालनानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते इनडोअर फायरिंग रेंज, ॲस्ट्रोअर्फ हॉकी व फुटबॉल मैदान तसेच आवेल मैदानातील सिन्थेटिक ट्रॅकचे भूमिपूजन करण्यात आले.Blogger द्वारा समर्थित.