समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत गिरगाव चौपाटी होणार स्वच्छ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई दि. ८ : पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आखण्यात आली आहे. ही मोहिम   दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत राबविण्यात येईल अशी माहिती विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा ठाणे यांनी कळवली आहे.

या मोहिमेत शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. या मोहिमेचा आरंभ ११ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता तर समारोप १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता होईल.

या कार्यक्रमास वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

गिरगाव चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत समुद्र किनारा स्वच्छता, समुद्रीय परिसंस्थेचा परिचय, छायाचित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्याचे आयोजन अशा स्वरूपाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.