राज्यपालांच्या हस्ते 'ये है मुंबई मेरी जान' पुस्तकाचे प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि. 7 : मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला या शहराने काम व ओळख दिली आहे,त्यामुळे या शहरावर सगळ्यांचेच प्रेम असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कुलवंत सिंग लिखित 'ये है मुंबई मेरी जान' पुस्तकाचे प्रकाशन हॉटेल ताज येथे करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, सरदार कुलवंत सिंग कोहली यांच्या पत्नी बिजी कोहली, निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. पी. एस. पसरिचा, दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, 'ये है मुंबई मेरी जान' या पुस्तकाचे शब्दांकन करणारे नितीन आरेकर आदी उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशनानंतर राज्यपाल म्हणाले, दिवंगत सिंग यांनी आपल्या पुस्तकात मुंबईचा इतिहास, मुंबईचे स्पिरीट, मुंबईचे वर्णन उत्तम पद्धतीने मांडले असून आता मराठीत हे पुस्तक आल्यामुळे मुंबईचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.