‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात युनिसेफचे राज्य समन्वयक विकास सावंत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार, दि. १४ आणि शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.      

युनिसेफतर्फे १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश, बालहक्क म्हणजे काय, बालकांची सद्य:स्थिती, जनजागृती मोहिमेची उद्दिष्टे, बालकांचे हक्क व सुरक्षिततेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, सप्ताहादरम्यान करण्यात येणारी जनजागृती,  बालकांना सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित कसे करता येईल, बालगुन्हेगारीसाठी कारणीभूत घटक आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.सावंत यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.