मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भारतीय संविधानाला वंदन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  


मुंबई, दि.26: भारतीय संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी संविधानाला वंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संविधानापुढे नतमस्तक होत संविधानाप्रती आदर व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वोत्कृष्ट संविधानाच्या माध्यमातूनच भारत संपूर्ण जगाला मार्गदर्शन करेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी वर्षा निवासस्थानी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संविधानाला वंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.