राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


पासबान-ए-अदब या संस्थेतर्फे आयोजित अनुभूती कवी संमेलन

मुंबई, दि.3 : पासबान-ए-अदब या संस्थेतर्फे आयोजित अनुभूती कवी संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले. श्री.कोश्यारी यांनी या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी सर्व कवींचा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी खासदार तथा यु.पी. हिंदी संस्थानचे अध्यक्ष डॉ.उदय प्रताप सिंह यांना राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. संयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांच्या शऊरे अस्र आणि दश्त ए जाँ या पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते झाले.


हे संमेलन भारतीय भाषा आणि साहित्याच्या प्रचार व प्रसारासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे श्री.खालिद यांनी सांगितले.

कवि संमेलनात कवी प्रा. अशोक चक्रधर, माजी खासदार तथा यु.पी.हिंदी संस्थानचे अध्यक्ष डॉ. उदय प्रताप सिंह, इंदिरा गांधी सेंचर फॉर आर्टस नवी दिल्लीचे निदेशक डॉ. सच्चिदानंद जोशी, दीक्षित दनकौरी, हस्तीमल हस्ती, माया गोविंद, संदीप नाथ, रणजित चौहान, अभिनेते राजपाल यादव उपस्थित होते.

कवी अथर शकील यांच्या तु रश्के जमी, तु रश्के जहाँ मेरे ही हिंदोस्ता... या शेरने काव्य संमेलनाला प्रारंभ झाला. त्यानंतर डॉ. उदय प्रताप सिंह यांच्या साँस खिंचने की पूर्व ठिक से विचार करे...न मेरा है न तेरा है, हिंदुस्तान सबका है...या काव्यपक्तीने श्रोत्यांच्या टाळ्या घेतल्या.

दीक्षित दनकरी यांनीही श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांच्या ए गझल पास ना आ... गुनगुना लू तुझे... तू सवारे मुझे...मैं सवारे तुझें...या कवितेने श्रोते मंत्रमुग्ध झाले. प्रा. अशोक चक्रधर यांनीही आपल्या कविता सादर केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.