महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १९ जानेवारीला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहे.  

इ. 1 ली ते इ. 5 वी व इ. 6 ते इ. 8 वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या htpps://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे.

परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 08/11/2019 पासून सुरु होत असून दि. 28/11/2019 अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2019 वेळापत्रक

अ.क्र.
कार्यवाहीचा टप्पा
दिनांक व कालावधी
1
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी
08/11/2019 ते 28/11/2019
2
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे
04/01/2020 ते 19/01/2020
3
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-I दिनांक व वेळ
19/01/2020 वेळ स.10.30 ते दु.13.00
4
शिक्षक पात्रता परीक्षा-II दिनांक व वेळ
19/01/2020 वेळ दु.14.00 ते सायं.16.30

000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.