मा.मंत्री श्री.एकनाथ संभाजी शिंदे यांचा परिचय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
नाव               :    श्री.एकनाथ संभाजी शिंदे
जन्म                     :      6 मार्च, 1964
जन्म ठिकाण          :      दरेगांव, तालुका जावळी, जिल्हा सातारा.
शिक्षण                  :      एच.एस.सी.
ज्ञात भाषा                     :      मराठी, हिंदी इंग्रजी
वैवाहिक माहिती     :      विवाहित, पत्नी श्रीमती लता
अपत्ये                   :      एकूण 1 (एक मुलगा)
व्यवसाय                :      उद्योग/सामाजिक कार्य
पक्ष                       :      शिवसेना
मतदारसंघ             :      147-कोपरी-पाचपाखाडी, जिल्हा ठाणे
इतर माहिती           :      संपूर्ण ठाणे शहर जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडिअम, इंटरर्निटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहीद हेंमत करकरे क्रीडा संकुल, जॉगिंग पार्क,  सेंट्रल लायब्ररी सुरू केली; आदिवासी प्रभाग मोखाडा, तलासरी जव्हार येथील आश्रमशाळेत आरोग्य केंद्रात सकस आहार आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करून रूग्णांना विनामूल्य औषध वाटप केले; पालघर, बोईसर सफाळे परिसरात शिवसेनेतर्फे एस.एस.सी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन; गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप; पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप; वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन; अध्यक्ष, ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन; उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटना; पूरग्रस्तांना मदत; ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिकीकरणासाठी विशेष योगदान; शिवसेना शाखा प्रमुख, वागळे इस्टेट, किसननगर नं.2, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख; पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग, दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, ठाणे महानगरपालिका; 2004-2009, 2009-2014 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा; 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; डिसेंबर, 2014 ते ऑक्टोबर, 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री, ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभेवर फेरनिवड.
(संदर्भ: 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.