लोकनायक बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी राज्यपालांनी केले अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 15 : क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी लोकनायक बिरसा मुंडा यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता तसेच राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार उपस्थित होते.

आदिवासी व ग्राम विकास विभागातर्फे सादरीकरण

आदिवासी विकास विभाग तसेच ग्रामविकास विभागातर्फे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज आदिवासी विकास योजनांसंदर्भात विस्तृत माहितीचे सादरीकरण करण्यात आले.

राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ९.३५ टक्के लोकसंख्या अनुसूचित जमातीची असून अनुसूचित क्षेत्रात आदिवासी उपयोजना राबविली जाते. आदिवासी विकासासाठी उपलब्ध नियतव्ययापैकी मोठा खर्च आदिवासी शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी केला जात असल्याची माहिती प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली. राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्याच्या अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पाच टक्के निधी थेट दिला जातो. गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील पेसा ग्रामपंचायतींना एकूण ८७७.४३ कोटी रु निधी देण्यात आला. या निधीतून ग्रामपंचायती आपल्याला आवश्यक त्या योजना सुरु करू शकतात, अशी माहिती असीम कुमार गुप्ता यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाची राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने प्रशंसा केली असल्याचे मनिषा वर्मा यांनी सांगितले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.