जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी ३० नाव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई दि. 22 : जलसंधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नाव्हेंबर २०१९ आहे.

जल संधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर केले आहेत. यंदाचे पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, या पुरस्कारासाठी केंद्र शासनाने राज्यातील विविध संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी www.mowr.gov.in किंवा www.cgwb.gov.in यासंकेतस्थळास भेट द्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.