सह्याद्री वाहिनीवर उद्या 'संविधान दिन' कार्यक्रमाचा वृत्तान्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. २९ : सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभाग तसेच डॉ. बाबासाहेब  आंबेडकर  संशोधन व  प्रशिक्षण  संस्था ( बार्टी) पुणे यांच्या मार्फत नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा प्रारंभ संविधान दिनाचे औचित्य साधून   करण्यात आला. या कार्यक्रमाचा वृत्तान्त  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शनिवार दि.३०  नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता  प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे  यांनी या वृत्तान्ताचे वाचन केले आहे.

राज्यात २६ नोव्हेंबर २०१९ ते  २६ नोव्हेंबर २०२० या वर्षाच्या कालावधीत नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहीमराज्यात राबविण्यात येणार असून पुढील वर्षभर शासनाच्या  सर्व विभागांमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे  पार पडलेल्या  कार्यक्रमप्रसंगी  मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विधिज्ञ डी.एन. संदानशीव, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर उपस्थित होते. या जागरुकता मोहीम शुभारंभ कार्यक्रमाचा वृत्तान्त दूरदर्शनवर या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.