मा.मंत्री श्री. जयंत राजाराम पाटील यांचा परिचय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नाव               :    श्री. जयंत राजाराम पाटील
जन्म                     :      16 फेब्रुवारी 1962
जन्म ठिकाण          :      सांगली.
शिक्षण                  :      बी. . (सिव्हील)
ज्ञात भाषा                     :      मराठी, हिंदी इंग्रजी.
वैवाहिक माहिती     :      विवाहित, पत्नी श्रीमती शैलजा
अपत्ये                   :      एकूण 2 (दोन मुलगे)
व्यवसाय                :      शेती
पक्ष                       :      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष .
मतदारसंघ             :      283-इस्लामपूर ,जिल्हा-सांगली
इतर माहिती           :      चेअरमन, राजारामबापू सहकारी साखर कारखाना लि; उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस; चेअरमन, कासेगाव शिक्षण संस्था; चेअरमन, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ; संचालक, वसंतदादा शुगर इस्टिट्युट, पुणे; सदस्य, अखिल भारतीय साखर संघ, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सहकारी बँका, पतसंस्था, सहकारी सूतगिरणी, सहकारी ग्राहक भांडार, शेती पदवीधर संघ; कुक्कुटपालन सह. सोसायटी इत्यादी संस्था स्थापना करून जनसामान्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अथक परिश्रम घेतले; सदस्य, कार्यकारी मंडळ शिवाजी विद्यापीठ, सांगली जिल्हा व्यसनमुक्ती समिती राजाराम बापू ज्ञान प्रबोधनी; कौन्सिल मेंबर, इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कॉलेज, राजाराम नगर; सर्व संस्थाचे काम संगणकाच्या माध्यमातून करण्यामध्ये अग्रेसर; मे 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; 1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य , महाराष्ट्र विधानसभा ; नोव्हेंबर 1999 ते डिसेंबर 2008 अर्थ नियोजन खात्याचे मंत्री ; 1999 पूर्वी विस्कटलेली राज्याची घडी योग्य मार्गावर आणण्यासाठी अर्थमंत्री म्हणून प्रदीर्घकाळ योगदान दिले; डिसेंबर 2008 मध्ये काही काळासाठी गृह खात्याचा कार्यभार; नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2014 ग्रामविकास खात्याचे मंत्री; प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.
(संदर्भ: 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.