'जागो ग्राहक जागो' या मोहिमेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 29 : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयातर्फे 'जागो ग्राहक जागो' या मोहिमेअंतर्गत नुकताच सिडनहॅम कॉलेज, चर्चगेट येथे एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे, शिधावाटप नियंत्रक कैलास पगारे, उप नियंत्रक शिधावाटप सर्वश्री लीलाधर दुपारी, ज्ञानेश्वर जवंजाळ, अजिंक्य बगाडे, प्रशांत काळे, गणेश जाधव व सुहास शेवाळे हे उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य हे मोठया प्रमाणात उपस्थित होते. या दिवसभराच्या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ.सिताराम दीक्षित, अध्यक्ष कन्झुमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया यांनी ग्राहक संरक्षण कायदा (2019 सुधारित) यासंदर्भात सुधारित तरतुदीबाबत मार्गदर्शन केले. उपनियंत्रक शिधावाटप ई परिमंडळ प्रशांत काळे यांनी अन्नसुरक्षा कायदा व ई पॉस मशिन या बाबत माहिती दिली. तर, सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र पांडुरंग बिराजदार यांनी थेट विक्री करणाऱ्या कंपन्यांचे कामकाज व त्यांच्या विरुद्ध येणाऱ्या तक्रारीचे निराकरण तसेच वैधमापन शास्त्र यंत्रणेचे कार्य यासंदर्भात माहिती दिली. दक्षिण मुंबई ग्राहक निवारण मंचाच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहा म्हात्रे यांनी वस्तू व सेवा खरेदीमध्ये होणारी ग्राहकांची फसवणूक व त्यांचे निराकरण, ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांचे विविध हक्क व रेरा कायदा या संदर्भात न्यायिक प्रक्रिया यासंदर्भात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. देशपांडे यांनी तर कार्यक्रमाचे समारोप श्री.जवंजाळ यांनी करुन सर्व उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.