'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या, परवा 'महाराष्ट्राची समृद्ध रंगभूमी' या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची 'महाराष्ट्राची समृद्ध रंगभूमी' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि.०६ आणि गुरुवार दि. ०७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. 'दिलखुलास' हा कार्यक्रम  प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर' या ॲपवरही बुधवार दि.०६ आणि गुरुवार दि. ०७ नोव्हेंबर २०१९ रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत  ऐकता येईल. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्रात दि. ५ नोव्हेंबर या दिवशी विष्णूदास भावे यांच्या जयंतीनिमित्त रंगभूमी दिवस साजरा केला जातो. याचे महत्त्व, संगीत नाटकांचा सुवर्णकाळ, प्रायोगिक रंगभूमीपुढील आव्हाने, नव्याने नाटकाकडे वळणाऱ्या युवा वर्गाला करिअर म्हणून असलेली संधी, नाटक अधिक समृद्ध व्हावे म्हणून आजच्या काळात करावे लागणारे प्रयत्न, नाट्यसंमेलनाचे फायदे या विषयांची माहिती श्री. प्रसाद कांबळी  यांनी 'जय महाराष्ट्र' आणि  'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.