दुसऱ्या राष्ट्रीय जलपुरस्कारासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 18 : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग यांच्यामार्फत जलसंधारण संदर्भात जनजागृतीस प्रोत्साहन देण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रीय जलपुरस्कार 2019 ची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय जलपारितोषिके हे उत्कृष्ट राज्य, जिल्हा, नगरपालिका, पंचायत समिती, गाव, ग्रामपंचायत, शाळा, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, वर्तमानपत्र इत्यादींना देण्यात येणार आहेत.
          
पुरस्कार निवड निकषानुसार राज्य शासनामार्फत जल वापरासंदर्भात निगडीत असलेल्या जलसंपदा, जलसंधारण, कृषी, उद्योग विभागामार्फत या क्षेत्रात करण्यात आलेल्या विशेष कार्याची माहिती, चित्रफित (व्हिडिओ) याचा समावेश असणारा सर्वसमावेशक प्रस्ताव दि. 19 नोव्हेंबर 2019 पर्यंत विभागास सादर करावा. तसेच राष्ट्रीय जल पारितोषिकांपैकी उत्कृष्ट राज्यया पुरस्कारासाठी जलसंपदा, जलसंधारण, कृषी, उद्योग विभागाच्या वतीने राज्य शासनामार्फत दि. 30 नोव्हेंबर 2019 पूर्वी प्रस्ताव पाठवावेत, तसेच अन्य विषयासंदर्भातील पारितोषिकांसाठी संबंधित विभागाने त्यांचे प्रस्ताव जलशक्ती मंत्रालयास परस्पर पाठवावे, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
०००
काशिबाई थोरात/वि.सं.अ./18/11/19

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.