दत्तात्रय पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागारपदी नियुक्ती; उप लोक आयुक्त कार्यालयात निरोप समारंभ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 4 : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागारपदी राज्याचे उपलोकायुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची नियुक्ती झाली असल्याने त्यांना आज लोक आयुक्त आणि उप लोकायुक्त कार्यालय, मुंबई यांच्या वतीने निरोप देण्यात आला.

यावेळी लोक आयुक्त माजी न्यायमूर्ती टहलियानी, उप लोक आयुक्त डॉ.शैलेश कुमार शर्मा, प्रबंधक म.सी. गुप्ता तसेच सहायक प्रबंधक श्रीमती अ.अ. देशपांडे आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करुन पडसलगीकर यांच्या कार्याचा गौरव केला. पडसलगीकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

श्री.पडसलगीकर यांनी गुप्तचर संस्था, मुंबई पोलीस आयुक्त अशा विविध पदांवर वरिष्ठ अधिकारी म्हणून सचोटी व कर्तव्यदक्षतेने उल्लेखनीय कामगिरी केल्याचा उल्लेख मान्यवरांनी केला.

यावेळी श्री.पडसलगीकर म्हणाले, पोलीस क्षेत्रात काम करीत असताना सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच लोक आयुक्त कार्यालयात काम करीत असताना या ठिकाणी असलेले सामाजिक प्रश्न हाताळण्याची संधी मिळाली.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.