वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 13 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी राज्यसभेचे सदस्य शरद पवार, महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, श्रीमती मेघना तळेकर, राजेश तारवी, नागनाथ थिटे, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.