कुटुंबसंस्था टिकविण्यामध्ये आईची भूमिका महत्त्वाची : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 30 : कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी तसेच मुलांमध्ये संस्कार व मूल्ये रुजविण्यासाठी आईची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. भारतीय संस्कृतीमध्ये आईला सर्वोच्च स्थान दिले आहे. शांतीपूर्ण समाज निर्मितीसाठी कुटुंब आनंदी असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मातृ परिषदेच्या सांगता समारोहाला उपस्थित राहण्यासाठी मुंबई भेटीवर आलेल्या महिला प्रतिनिधींनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांसह बल्गारीया, जॉर्जिया, जर्मनी, इराण, कझाकस्थान, नेपाल व उझबेकिस्तान या देशांसह भारतातील महिला प्रतिनिधी यावेळी उपस्थित होत्या. 
००००

Role of Mother crucial in keeping family together: Governor

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari today said that the role of mother is most critical in keeping the institution of family intact and in imparting moral and ethical values to children.  Stating that Indian culture has given higest importance to mother, he said, a happy family is a prerequisite for a peaceful society.

The Governor was interacting with a group of women delegates from various countries at Raj Bhavan, Mumbai on Saturday (30th Nov).

The women delegates were in Mumbai to attend the valedictory session of the Conference on Global Mothers hosted by SNDT Women’s University.

Vice Chancellor of SNDT Women’s University Dr Shashikala Wanjari, delegates from Bulgaria, Georgia, Germany, Iran, Kazakhstan, Nepal, Uzbekistan and India were present.

0000

भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मुंबई, दि. 30 :  रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील भारतीय लोकशाही नेतृत्व संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सुशासन, समाजकारण यांसह विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली.

लीडरशिप, पोलिटिक्स गव्हर्नन्सहा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या अभ्यासक्रमाचे संचालक देवेंद्र पै तसेच विविध राज्यातील विद्यार्थी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
0000


Student-Delegates from Indian Institute of Democratic Leadership meet Governor

Mumbai, Dt. 30 : A group of student delegates from the Indian Institute of Democratic Leaderhip met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Saturday (30th Nov).

The delegates had an informal discussion with the Governor on issues of good governance and social service.

The students are undergoing a one year Post graduate programme in Leadership, Politics and Governance at the Indian Institute of Democratic Leadership, an initiative of the Rambhau Mhalgi Prabodhini.
0000

अतिरिक्त सहाय्यक अधीक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 30 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त सांताक्रूझ-कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरुपात अतिरिक्त सहाय्यक अधीक्षिका हे पद भरण्यात येणार आहे. महिलांसाठी असलेले हे पद कंत्राटी पद्धतीचे असून या पदासाठी 23 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची पात्रता व इतर अटी पुढीलप्रमाणे आहेत. 1. अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य), 2. शिक्षण- एस.एस.सी. पास, 3. एमएससीआयटी उत्तीर्ण व टंकलेखन (टायपिंग) येणाऱ्यास प्राधान्य, 4. वयोमर्यादा-30 ते 50 वर्षे, 5. मानधन रु. 17,823/- दरमहा एवढा देण्यात येणार आहे.

अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक 23 डिसेंबर 2019 असून मुलाखतीची तारीख – 24 डिसेंबर 2019  अशी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कमांडर मिनल मधू पाटील यांनी केले आहे.

पत्रव्यवहाराचा पत्ता - जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर, 9 वा माळा प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व, मुंबई - 400 051, दूरध्वनी – 26552172

तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने जनसेवक हरपला - मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई दि.30- माजी  राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने संवेदनशील जनसेवक हरपला  आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, माजी राज्यमंत्री दिघोळे यांनी 1985  ते 1999 या कालावधीत तीन वेळेस आमदार म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडले. युती सरकारच्या काळात ऊर्जा आणि ग्रामविकास खात्याचे  राज्यमंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. त्यांनी नाशिक येथील व्ही.एन. नाईक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि  सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचे शैक्षणिक, राजकीय, सहकार  आणि  सामाजिक क्षेत्रातील कार्य नेहमीच स्मरणात राहील.

‘दिलखुलास' कार्यक्रमात सोमवारी उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान' या विषयावर उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 2, मंगळवार दि.3  डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.25  ते 7. 40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, कामगारमंत्री म्हणून डॉ. बाबासाहेबांनी केलेले कार्य त्याचबरोबरऔरंगाबादमध्ये झालेल्या तीन दिवसीय जागतिक बैाध्द धम्म परिषदेचा उद्देश, या बौध्द परिषदेची फलनिष्पत्ती आदी विषयांची माहिती डॉ. कांबळे यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

गदिमा, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके यांना 'अलौकिक त्रिमूर्ती'च्या माध्यमातून स्वरांजली!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 30 : गदिमा, पु. ल.आणि बाबूजी या तिन्ही सारस्वतांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अक्षरसाहित्य आणि गाण्यांवर आधारित 'अलौकिक त्रिमूर्ती' या विशेष कार्यक्रमाद्वारे शब्दसुमनांजली आणि स्वरांजली   वाहण्यात आली.  सांस्कृतिक कार्य विभाग व मराठी भाषा विभागाच्या वतीने  प्रभादेवी  येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
       
यावेळी  ग.दि.माडगूळकरांचे  सुपुत्र प्रख्यात लेखक आनंद माडगूळकर , बाबूजींचे सुपुत्र प्रख्यात गायक-संगीतकार  श्रीधर फडके , सांस्कृतिक कार्य  विभाग प्रधान सचिव भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य  विभाग उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य  विभाग संचालक विभीषण चवरे,  सांस्कृतिक कार्य  विभाग सह संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होते.  अभिनेते ऋषिकेश जोशी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर उत्तरा मोने यांनी कार्यक्रमाची संहिता, संशोधन आणि आखणी केली.

महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्येष्ठ गीतकार ग.दि.माडगूळकर, अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारे अष्टपैलू लेखक  पु. ल. देशपांडे आणि मराठी माणसाच्या हृदयावर आपल्या सुरांनी आपले नाव कोरणारे बाबूजीम्हणजेच लाडके संगीतकार सुधीर फडके या त्रयीने आपल्या प्रतिभेने महाराष्ट्रात आपले युग निर्माण केले आणि कित्येक दशके मराठी मनावर कायम अधिराज्य गाजवले. ग.दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी मिळून मराठी चित्रसृष्टीत आपले एक युग निर्माण केले. या दोघांची अनेक अजरामर गीते 'अलौकिक त्रिमूर्ती' या कार्यक्रमात यावेळी सादर करण्यात आली . या कार्यक्रमामध्ये नचिकेत लेले  यांनी कानडा राजा पंढरीचा ,"तुझे गीत गाण्यासाठी ", "निजरूप  दाखवा हो " , "स्वये श्री रामप्रभू" आणि माझे जीवन गाणे ही गाणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या बरोबरच हृषिकेश रानडे याने "एक धागा सुखाचा , "झाला महार पंढरीनाथ", "ने मजसी ने परत मातृभूमीला", "घन घन माला", " वेदमंत्राहून आम्हा" हे गाणे सादर केले.बाबूजींची काही अजरामर गाणी या कार्यक्रमात सादर केली.तसेच "विकत घेतला  श्याम", "माझा होशील का","एकाच या जन्मी  जणू ", "जाळीमंदी पिकली करवंद "आणि  त्या तिथे पलीकडे हे चित्रगीत भावगीत गायनात स्वत:चा अनोखा ठसा उमटवलेल्या मालती पांडे  यांची नात म्हणजेच प्रियांका बर्वे हिने सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. केतकी भावे जोशी यांनी "या सुखांनो या ", "जिवलगा कधी रे येशील तू ", "नाच रे मोरा "आणि उसाला लागलं कोल्हा", ही गाणी आपल्या खास शैलीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
      
साक्षात पु.ल साकारण्यासाठी प्रसिध्द असलेले आनंद इंगळे आणि संजय मोने  यांनी "पु.लं. आणि बबडू" हा अभिनय सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तसेच मी ब्रह्मचारी असतो तर, असा मी असामी, बिगरी ते म्याट्रिक, गदिमांच्या दिलदारपणाचा प्रसंग 'पुल'कित गदिमा, माझे खाद्यजीवन अभिवाचन केले. कार्यक्रमामध्ये यावेळी ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांच्या बद्दलच्या आठवणी, किस्से चित्रफितीच्या माध्यमातून  त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हणजेच श्रीधर फडके,  आनंद  माडगूळकर, दिनेश ठाकूर, अभिनेते रमेश देव, अभिनेत्री  सीमा देव, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ  ध्वनिमुद्रक रवींद्र साठे, या मान्यवरांनी  जागवल्या.

समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवूया - विश्वासदर्शक ठरावानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




विश्वासदर्शक ठराव १६९ मतांनी संमत

मुंबई दि. ३० : मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या सभागृहात आलो असून  महाराष्ट्रातील साधु-संत आणि समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले. 

मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव १६९ मतांनी संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कामकाज झाले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मंत्रिमंडळावर सदस्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे, त्याबद्दल मी आभार मानतो.  तमाम जनतेचे आभार मानून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या समाजसुधारकांना आणि आई-वडिलांचे स्मरण करीत महाराष्ट्र घडविण्याची  शपथ घेतली आहे. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

देशात अनेक राज्ये आहेत त्यात महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा असून हे दैवत या मातीत जन्माला आले आहे.  हे राज्य साधू-संतांचे, वीरांचे आणि समाजसुधारकांचे आहे. मी मैदानातला माणूस असून वैधानिक वातावरणात आलो आहे, ते महाराष्ट्र घडविण्यासाठी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, सभागृहात झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले.  ठरावाच्या विरोधात मतदानासाठी  सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हता.  सदस्य श्री.अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य सर्वश्री जयंत पाटील, नवाब मलिक, सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले.  विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अबू आझमी, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. 

सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ.नितीन राऊत या सदस्यांना परिचय करून दिला.

उद्या सायंकाळी चार वाजता विधानपरिषदेची बैठक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक उद्या दि. 1 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 4.00 वाजता भरविण्यात येणार आहे. विधानपरिषदेच्या सर्व सदस्यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत. याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या दि. 1 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून सकाळी 11.00 वाजता कामकाज सुरू होणार आहे, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव यांनी कळविले आहे.

विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



विधानमंडळ सचिवालयाची माहिती

मुंबई, दि.29 : नवीन मंत्री महोदयांचा परिचय आणि मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक शनिवार, दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 02.00 वाजता विधानभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

विधानसभेच्या सर्व सदस्यांनी विधानभवन, मुंबई येथे विधानसभेच्या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार, दिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता विधानसभा सभागृहात घेण्यात येणार आहे.

या निवडणकीसाठी नामनिर्देशनपत्र शनिवार, दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत कक्ष क्र.021, तळ मजला, विधानभवन, मुंबई येथे सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा, विधान भवन, मुंबई यांच्याकडे पोहोचतील, अशा बेताने पाठविण्यात यावे. नामनिर्देशन पत्रांची छाननी त्याचदिवशी दुपारी 12.00 वाजता करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत रविवार, दिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत असेल. नामनिर्देशनपत्र आणि उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाच्या प्रती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या '' कक्ष, अकरावा मजला, विधानभवन, मुंबई येथे उपलब्ध असून या निवडणकीचा कार्यक्रम, नोटीस, नामनिर्देशनपत्र, उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाचा नमूना इत्यादी सर्व कागदपत्रे विधानसभा सदस्यांना त्यांच्या ई-मेल पत्त्यावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर या प्रती महाराष्ट्र विधमंडळाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे श्री.भागवत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

आरे कारशेडच्या कामांना स्थगिती; आढाव्यानंतर पुढील निर्णय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 29 : राज्य शासनाचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकास कामे होणार नाहीत. त्यामुळे आरेमधील मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून या कामाचा पूर्णपणे आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. आमदार आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी मुख्यमंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी मुख्यमंत्र्यांचे तर कार्यवाह विवेक भावसार यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांपासून पत्रकार संघाशी जे ऋणानुबंध आहेत, माझ्यापासून ते ‌अजून दृढ होत आहेत, याचा आनंद आहे. शासन चालविण्याचे आव्हान मोठे असून महागाई, टंचाई, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना करायचा आहे. पत्रकारांची टीका सकारात्मक हवी. त्यासाठी पत्रकारांनी या शासनाचे कान, नाक, डोळे होऊन सरकारच्या घोषणांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनासोबत यावे. तसेच हे काम करणारे सरकार असून या शासनाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी पत्रकारांनी विधायक सूचना करुन सहकार्य करावे, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.

हे आपल्या सगळ्यांचे सरकार आहे. जनतेच्या पैशातून विविध योजनांवर खर्च केला जातो. त्यामुळे योजनांवर खर्च करताना हा करदात्याचा पैसा आहे, हे लक्षात ठेवून उधळपट्टी होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना आज झालेल्या सचिवांबरोबरच्या बैठकीत केल्या आहेत. आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्या कामाचा आढावा घेतला जाईल. पुढील निर्णय होईपर्यंत तेथे वृक्षतोडीस स्थगिती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.   

मी मुंबईत जन्मलेला पहिलाच मुख्यमंत्री असल्यामुळे मुंबईसाठी काय करता येईल, याचा विचार सुरू आहे. मात्र, त्याबरोबरच राज्यातील इतर शहरांसाठीही कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दलही विचार करत आहे. शेतकऱ्यांसाठीही निर्णय घेण्याची घोषणा केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी प्रास्ताविकात संघाच्या परंपरेची माहिती देऊन, राज्याच्या विकासात पत्रकारांनी सहकार्य करावे, या मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या आवाहनानुसार सर्व पत्रकार सहकार्य करतील, असे सांगितले.

मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे उपाध्यक्ष दीपक भातुसे, कोषाध्यक्ष महेश पावस्कर आदी यावेळी उपस्थित होते.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/29.11.2019

Blogger द्वारा समर्थित.