नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत मुख्य सचिवांना सादर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 30 : विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचनेची प्रत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज मुख्य सचिव अजोय मेहता यांना सादर केली.

या अधिसूचनेद्वारे नवीन विधानसभा गठित झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी यावेळी सांगितले. या अधिसूचनेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची मतदारसंघनिहाय तसेच राजकीय पक्षनिहाय नावे देण्यात आली आहेत.

राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठीची निवडणूक मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या प्रयत्नांची माहितीही श्री. सिंह यांनी मुख्य सचिवांना दिली.

यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त व व्ययचे सचिव राजीव मित्तल, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अजित सगणे, स्टेट वेअर हाऊसिंग कार्पोरेशनचे सह व्यवस्थापकिय संचालक अजित रेळेकर, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी आदी  उपस्थित होते.
०००००
 नंदकुमार वाघमारे/विसंअ/30.10.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.