'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या 'सोशल मीडिया व निवडणूक' या विषयावर पोलीस अधीक्षक डॉ.बाळसिंग राजपूत यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत





मुंबई, दि. ३  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात 'सोशल मीडिया व निवडणूक' या विषयावर पोलीस अधीक्षक तथा  विधानसभा निवडणूक २०१९ सोशल मीडिया मॉनिटरींगचे  राज्य समन्वयक  डॉ.बाळसिंग राजपूत यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.४ ऑक्टोबर, २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.      
     
सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी, विधानसभा निवडणूक २०१९ सोशल मीडिया मॉनिटरींगचे कामकाज, फेक जाहिराती कशा ओळखाव्यात, क्रियाशील सायबर संस्कृती म्हणजे काय,सोशल मीडियासंदर्भातील तक्रारीसाठी कुठे संपर्क साधावा, या विषयांची  सविस्तर माहिती डॉ. राजपूत  यांनी 'जय महाराष्ट्र'  या कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.