'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची मुलाखत ‍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


 
'दिलखुलास' कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी याच मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि.10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र'    'दिलखुलास' कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे ‍यांची 'लोकशाहीचा बाळगू अभिमान,चला……..करू मतदान!' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  सोमवार दि. १४ आणि  मंगळवार दि. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे. या कार्यक्रमात मतदार जागृती  उपक्रमांची जिल्हानिहाय माहिती दिलेली आहे. 
    
स्वीप उपक्रम नेमका काय आहे ? निवडणुकांत मतदान वाढावे याकरिता सुरु असलेले प्रयत्न, विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीवर देण्यात येणारा भर, मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम,सदिच्छादूतांचा सहभाग या विषयांची माहिती श्री. दिलीप शिंदे ‍यांनी 'जय महाराष्ट्र' आणि  'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.