'दिलखुलास'कार्यक्रमात उद्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


   
मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या संचालक तथा राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालक डॉ.साधना तायडे यांची  'रक्तदान पवित्र दान' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर  २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक आशुतोष सावे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
     
या मुलाखतीमध्ये रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानापूर्वी केल्या जाणाऱ्या तपासण्या, राज्याची रक्ताची गरज, रक्त संकलन केंद्र, रक्त व रक्तगटाचे जीवनमान, राज्य रक्तसंक्रमण परिषदेचा उद्देश याविषयावर सविस्तर माहिती डॉ.साधना तायडे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.