नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत राज्यपालांना सादर

1 टिप्पणीमुंबई, दि. 25 - प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना राज्यपालांना सादर केली. 

या अधिसूचनेद्वारे नवीन विधानसभा गठित झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री.सिंह यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांना सांगितले. या अधिसूचनेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची मतदारसंघनिहाय तसेच राजकीय पक्षनिहाय नावे देण्यात आली आहेत.

राज्यातील निवडणूक मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी आयोगाने केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली. 


यावेळी भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव अनुज जयपुरीयार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सह मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड व अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर हे उपस्थित होते.


**

State Chief Electoral Officer presents List of Elected Assembly Members to Governor

Mumbai Dt.२५ - The State Chief Electoral Officer of Maharashtra Baldev Singh today presented the list of elected members to the Legislative Assembly to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Friday (२५th Oct).

Baldev Singh told the Governor that with the publication of the Notification of the Election Commission of India, the new Maharashtra Legislative Assembly has been constituted. The Notification contains constituency-wise and party-wise list of members elected to the State Legislative Assembly.

The State Chief Electoral Officer apprised the Governor about the efforts taken for the conduct of free and fair elections.

Principal Secretary of the Election Commission of India Anuj Jaipuriyar, Additional Chief Electoral Officer Dilip Shinde, Joint Chief Electoral Officers Shirish Mohod and Anil Valvi were present.


1 टिप्पणी

Blogger द्वारा समर्थित.