मुंबई, दि. 17 :
नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांनी नेदरलँडमध्ये गुंतवणूक
करणाऱ्या भारतीय उद्योजकांशी हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट घेऊन संवाद साधला. द
नेदरलँड्स फॉरेन इन्व्हेस्टमेंट एजन्सी (एनएफआयए) ही अर्थ व पर्यावरण धोरण
विभागाची कार्यकारी घटक आहे. त्याचे भारतातील कार्यालय गेल्या बारा वर्षापासून
कार्यरत आहे. कार्यकारी संचालक श्री. अर्नोउद बेसेलिंग त्याचे प्रमुख आहेत.
मुंबई, बंगलोर व
दिल्ली येथील दूतावासात त्यांच्या कार्यशील टीम आहेत. भारतीय निर्यातीच्या एकूण
वीस टक्के निर्यात ही नेदरलँडमार्गे युरोपमध्ये केली जाते व नेदरलँडला भारतासाठी युरोपचे
प्रवेशद्वार समजले जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात भारतीय उद्योजक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा