अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 21 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावे असे आवाहन करीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

कुलाबा विधानसभा मतदार संघातील के सी महाविद्यालय या मतदान केंद्रावर जावुन त्यांनी मतदान केले.त्यांच्यासह शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, माहिती तंञज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास,सचिव श्रीमती कुंदन, सचिव पराग जैन, माजी पोलीस महासंचालक जावेद अहमद तसेच परिसरातील नव मतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच लोकशाहीसाठी मतदान अवश्य करा, असे आवाहनही मतदारांना केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.