ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 18 : राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 108 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासह पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदार संघांच्या 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 6 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.