जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 17 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावाए यासाठी मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नोव्हेंबर  महिन्यात  जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळा- कॉलेजमधील इच्छुक कलावंत स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने या युवा महोत्सवाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ ते २९ वयोगटातील कलाकारांसाठी आहे.

लोकनृत्य, लोकगीत,एकांकिका, शास्त्रीय गायन, शास्त्रीय संगीत, सितार, गिटार, बासरी, तबला, वीणा, मृदुंग, हार्मोनियम, शास्त्रीय नृत्य, मणीपूरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी, वक्तृत्व यात सहभागी होणाऱ्या कलावंतांनी 15नोव्हेंबर 2019 पर्यंत आपल्या प्रवेशिका dsomumbaisub@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.