'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी मिलिंद भारंबे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  'दिलखुलास' कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक तथा कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी विधानसभा निवडणूक-२०१९ मिलिंद भारंबे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  बुधवार दि. 16 आणि गुरुवार दि. 17 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच 'दिलखुलास' हा कार्यक्रम  प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर' या ॲपवरही बुधवार दि. १६ आणि गुरुवार दि. १७ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत  ऐकता येईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


विधानसभा निवडणुकीत राज्यात  कायदा व सुव्यवस्थेसाठी सुरक्षा यंत्रणांची तयारी, आचारसंहितेच्या काटेकोर अमंलबजावणीसाठी सुरु असलेले प्रयत्न, प्रत्यक्ष मतदानादिवशी मतदान केंद्रावर कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी सुरक्षा यंत्रणांची तयारी, स्थिर संनिरीक्षण  व भरारी पथके  यांची कामे आदी विषयांची  माहिती श्री. भारंबे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमात दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.