दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवारी, मंगळवारी 'महात्मा गांधी यांचे विचार व कार्य' या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात ज्येष्ठ  विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांचा सहभाग असलेली ' महात्मा गांधीजी यांचे  विचार व कार्य' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून 'दिलखुलास' कार्यक्रमात सोमवार दि.७ ऑक्टोबर आणि मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे. 

विश्वाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार आणि मूल्य, महात्मा गांधीजींच्या जीवनातील तत्त्वे, साहित्यिक गांधी, सत्य, अहिंसा आणि असहकार या विषयीचे विचार या विषयाची माहिती श्री.मोरे यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.