‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. २६ : जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी साजरा केला जात आहे. त्यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात  येणार आहे. या कार्यक्रमात पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, सहसंचालक धनंजय सावळकर आणि पर्यटन व्यावसायिक अवधूत मोरे  यांचा सहभाग आहे. हा माहितीपर कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०१९ रोजी  रात्री 9 वाजता प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे निवेदन  रेश्मा बोडके  यांनी केले आहे.


या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पर्यटनाची बलस्थाने, आधुनिक काळातील पर्यटनाचे बदलते  स्वरूप, महाराष्ट्राला लाभलेली पर्यटन स्थळे, पर्यटनामुळे निर्माण होणारा रोजगार, महाराष्ट्र पर्यटन विकास  महामंडळाने विकसित केलेली पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्र, सागरी, वन्यजीव, कृषी, पावसाळी पर्यटन यासह पर्यटनामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला मिळत असलेली चालना आदी विषयांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.