पूरग्रस्त जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गुणवत्तापूर्वक व माफक किंमतीत करण्याचे सहायक आयुक्तांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


सांगली, दि. 11 : अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिनांक 9 व 10 ऑगस्ट रोजी सांगली येथील 6 ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या आस्थापनांच्या तपासण्या केल्या. या आस्थापनांना पूरग्रस्त जनतेला शुध्द व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या पाण्याचा पुरवठा हा किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी केले आहे.

अन्न व औषध प्रशासनातर्फे मे. जैन फिल्टर वॉटर सप्लायर्स, एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली, मे. चैतन फिल्टर वॉटर सप्लायर्स, 100 फूटी रोड, अवधूत कॉम्प्लेक्स, सांगली, मे. टाटा फिल्टर वॉटर सप्लायर्स, 100 फूटी रोड, चेतना पेट्रोल पंपच्या बाजूला, सांगली, मे. श्रीशा वॉटर सप्लायर्स, हॉटेल पै प्रकाशच्या मागे, सांगली, मे. अमृत पेय जल, विश्रामबाग, सांगली व मे. कृषी उत्पन्न बाजार समिती वॉटर फिल्टर सप्लायर्स, मार्केट यार्ड सांगली या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या आस्थापनांच्या तपासण्या केल्या. या आस्थापनांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा माफक किंमतीत व गुणवत्तापूर्वक असा करण्याचे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा