पालकमंत्री सुभाष देशमुख यांची पूरबाधित मिरज ग्रामीण भागाला भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत 
सांगली, दि. 13 :  सांगली जिल्ह्यात आलेल्या पूरपार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसनमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मिरज ग्रामीण भागात भेटी देऊन पूरबाधितांना दिलासा दिला. यावेळी काही ठिकाणी त्यांच्या समवेत सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.

पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी हरिपूर, ढवळी आणि वड्डी भागातील काही ठिकाणी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. पूरबाधितांना सानुग्रह अनुदान आणि धान्य वाटप करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच पूरबाधितांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासन पूरबाधितांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा