अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या बंद - विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतकोल्हापूर, दि. 10: अतिवृष्टीमुळे सर्व मार्ग बंद झाल्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या बाराही आगारातील सर्व एस.टी. फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वाहतुकीचे सर्व मार्ग पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या सर्व आगारातील एसटी फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा