पूर परिस्थितीमुळे वन रक्षक भरती प्रक्रिया पुढे ढकलली सुधारित तारखा नव्याने कळविणार - वन विभागाची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि. 10- वन विभागातील वनरक्षक भरती प्रक्रिया २०१९ अंतर्गत ऑनलाइन लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पात्र उमेदवारांसाठी पुढील टप्प्यात कागदपत्रे तपासणे, शारीरिक मोजमाप, धाव चाचणी व लेखी परीक्षेतील गुण व धाव चाचणीतील गुण मिळून निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करणे तसेच २५/१६ कि.मी. (पुरुष/महिला) चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी घेणे व नियुक्ती आदेश निर्गमित करणे हे टप्पे वनवृत्त स्तरावर प्रादेशिक निवड समितीमार्फत आयोजित करण्यात आले होते. उमेदवारांना याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून कळविण्यातही आले होते. तथापि, राज्यातील पूर परिस्थिती आणि दळणवळणाची असुविधा लक्षात घेता वनरक्षक भरती प्रक्रियेतील पुढील टप्पे सद्यस्थितीत सुकर रितीने पार पाडणे शक्य  नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात  आली आहे. निवड प्रक्रियेच्या सुधारित तारखा प्रादेशिक निवड समितीमार्फत नव्याने कळविण्यात येतील. तसेच याबाबतची माहिती www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, वनरक्षक भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत पात्र सर्व उमेदवारांनी याबाबतची नोंद घ्यावी असे  विकास गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी कळविले आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा