पूर ओसरू लागल्याने काही स्थानकांमधून बस वाहतूक सुविधा पूर्ववत - अमृता ताम्हणकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


सांगली, दि. 13 : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे राज्य परिवहन महामंडळाचे अनेक मार्ग बंद करण्यात आले होते. सांगली बसस्थानकात पाणी साचल्याने परिणामी सांगली बसस्थानकातून बस वाहतूक सुविधा स्थगित करण्यात आली होती. पैकी काही बस पूर्ववत करण्यात आल्या असल्याची माहिती  विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली. दरम्यान, सांगली-पुणे बस वाहतूक सेवा विटामार्गे सुरूच होती. तसेच, सांगली बसस्थानकामधून उद्यापासून बस वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.


दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतची स्थिती पुढीलप्रमाणे - सुरू झालेले मार्ग - तासगाव - कराड (कुंडल मार्गे), आटपाडी - सोलापूर (पंढरपूर मार्गे), मिरज - सोलापूर (पंढरपूर मार्गे), विटा - कराड (कडेगाव मार्गे), इस्लामपूर - कराड (कासेगाव मार्गे), शिराळा - कराड (कासेगाव मार्गे), शिराळा - कोकरूड (बिळाशी मार्गे), शिराळा - सागाव (पुनवत मार्गे), पलूस तासगाव (पाचवा मैल), पलूस - पुणे (कराड, सातारा मार्गे), पलूस - नाशिक (कराड, सातारा मार्गे), पलूस त्रंबकेश्वर (कराड, सातारा मार्गे), पलूस - औरंगाबाद (कराड, सातारा मार्गे), जत - पुणे (विटा मार्गे), इस्लामपूर - वारणानगर (ऐतवडे मार्गे), इस्लामपूर - करंजवडे (मांगले मार्गे), इस्लामपूर - जुने खेड, कडेगाव - रायगाव (शाळगाव मार्गे), कडेगाव - अपशिंगे (नेर्ले मार्गे), कडेगाव - पाडळी (चिंचणी मार्गे), शिराळा - बांबवडे (वारणा मार्गे),


बंद असलेले मार्ग -  शिराळा - कांडवण (सोंडोली पुलावर पाणी), शिराळा - कोडोली (काखे पुलावर पाणी), पलूस - आमणापूर (आमणापूर पुलावर पाणी), सांगली - मौजे डिग्रज (मौजे डिग्रज रोडवर पाणी), सांगली - भिलवडी (भिलवडी पुलावर पाणी), मिरज - जमखंडी (कु़डची पुलावर पाणी), ताकारी - इस्लामपूर (ताकारी पुलावरील पाणी कमी झाले आहे. परंतु, जड वाहतुकीस अद्याप परवानगी मिळाली नाही.), इस्लामपूर - रेठरे फॅक्टरी (बहे पुलावरील पाणी कमी झाले आहे. परंतु, जड वाहतुकीस अद्याप परवानगी मिळाली नाही.), सांगली - इस्लामपूर (सांगली - बायपास रोडवर पाणी), सांगली - कुरुंदवाड (नृसिंहवाडीपर्यंत सुरू), सांगली - कोल्हापूर (विनावाहक सेवा बंद, बायपास रोडवर पाणी), सांगली - कोल्हापूर (पाणी कमी झाले आहे. परंतु, जड वाहतुकीस अद्याप परवानगी मिळाली नाही.), सांगली  - पलूस (शिव शंभो चौकात पाणी), शिराळा - इचलकरंजी (काखे पुलावर पाणी), शिराळा - सांगली (सांगली बायपास रोडवर पाणी), पलूस - सांगली (सांगली बायपास रोडवर पाणी), पलूस - इस्लामपूर (ताकारी पुलावर पाणी), पलूस - कोल्हापूर (आमणापूर पुलावर पाणी), पलूस - आमणापूर (आमणापूर पुलावर पाणी), पलूस - नागराळे (नागराळे येथे पाणी), पलूस - दुधोंडी (दुधोंडी येथे पाणी), पलूस - पुणदी (पुणदी येथे पाणी).
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा