अलमट्टीतून संध्याकाळपर्यंत ४ लाख ८० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू - शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई : दि. 9 :अलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने आज सायंकाळपर्यंत 4,80,000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. विरोधकांकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जाते आहे. राज्यात पूरपरिस्थिती असताना जनतेला दिलासा देणे सोडून चुकीच्या पद्धतीने माहिती देणे उचित ठरणार नाही, असे शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

संपूर्ण माहिती समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध असताना त्याकडे दुर्लक्ष करून अशा पद्धतीने चुकीची माहिती विरोधकांकडून दिली जात आहे. कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाने आज सकाळीच एक ट्विट करून 4,30,352 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग होत असल्याचे सांगिल्यानंतरसुद्धा कमी प्रमाणात विसर्ग असल्याचे भासविण्यात येत आहे. 3,80,316 क्यूसेक इतकी आवक असताना त्यापेक्षा 50,000 क्यूसेकने अधिक विसर्ग करण्यात येत होता. आता हा विसर्ग दुपारपर्यंत 4,50,000 क्यूसेकवर पोहोचला आहे, असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे.

दुसरा विषय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या 7 ऑगस्टच्या जीआरसंदर्भातील आहे. त्यात एखादे क्षेत्र 2 दिवस पाण्यात असल्यास मदतीबाबतचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात मदतीचा निकष हा पूर्णत: आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालाच्या आधारावर ठरतो. पण, विरोधकांनी त्यावर लगेच तुघलकी वगैरे आरोप करणे सुरू केले आहे. टीका करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याच काळात 30 जानेवारी 2014 चा जीआर पाहिला असता, तर कशी टीका करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. त्यांच्या काळात तर 7 दिवस एखादे क्षेत्र बुडित राहिल्याशिवाय मदत करायची नाही, असा नियम ठरविण्यात आला होता. (सोबत जीआर जोडत आहे.) हे राज्य सरकार संवेदनशील असून, पूर्णत: पूरग्रस्तांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे. आता पूरग्रस्तांना मदत वेळेत उपलब्ध होणे आवश्यक असून विरोधक त्याचे राजकारण करीत आहेत अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा