पूर ओसरु लागला; शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर- जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील 2 लाख 45 हजार 229 जणांचे स्थलांतर 

कोल्हापूर, दि. 11 : पंचगंगेच्या पातळीत कमालीची घट झाल्याने पाणी ओसरु लागले आहे.  आजअखेर एकूण 249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील 2 लाख 45 हजार 229 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यात शिरोळ तालुक्यातील 42 गावामधून 31 हजार 38 कुटुंबातील 1 लाख 55 हजार 186 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे - कागल - 35 गावातील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 53 सदस्य, राधानगरी- 17 गावातील 558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, गडहिंग्लज- 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा- 22 गावातील 87 कुटुंबातील 333 सदस्य, भुदरगड- 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार 31 सदस्य, शाहुवाडी- 6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा- 28 गावातील 405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, शिरोळ- 42 गावातील 31 हजार 38 कुटुंबातील 1 लाख 55 हजार 186 सदस्य, हातकणंगले-21 गावातील 7 हजार 526 कुटुंबातील 33 हजार 723 सदस्य, करवीर- 35 गावातील 5 हजार 101 कुटुंबातील 26 हजार 433 सदस्य, गगनबावडा- 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड- 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा