सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात ३२.१९ टीएमसी पाणीसाठा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



सांगली, दि. 9 : जिल्ह्यातील वारणा धरणात आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 पर्यंत 32.19 टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

दिनांक 9 ऑगस्ट रोजीच्या सकाळी 9 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 102.99 टीएमसी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 11.99 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 8.93 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 22.78 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व  राधानगरी  धरणात 8.29  टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 85.44  टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

तसेच सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 15000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर कोयना धरणातून 69075  क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 3 लाख 80 हजार 316 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 57 फूट 5 इंच इतकी पाण्याची पातळी असून धोका पातळी ४५ फूट ओलांडली आहे. अंकली पुल हरिपूर येथे 62 फूट 4 इंच इतकी पाण्याची पातळी असून धोका पातळी 50 फूट 3 इंच ओलांडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा