कोल्हापुरात २४९ मृत जनावरांची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
कोल्हापूर दि. 14  : अर्थ मुव्हींग काँट्रॅक्टर्स अँड मशिनरी ओनर्स असोसिएशन, अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स ग्रुप च्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाने आज अखेर 87 म्हैशी, 72 गायी, 19 वासरे आणि 51 शेळी-मेंढी या मृत जनावरांची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावली आहे.

अर्थमुव्हींग काँट्रॅक्टर्स अँड मशिनरी ओनर्स असोशिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील-सडोलीकर, सचिव रंगराव पाटील यांनी याबाबत माहिती दिली. रेडेडोह परिसर, चिखली, वडंणगे, अंबेगाव परिसरातील रस्त्यांवर आणि गावांमध्ये मृत जनावरे पडलेली होती. आज जेसीबीच्या माध्यमातून खड्डे खोदून ब्लिचिंग पावडर, कार्बोलिक ॲसिडच्या वापर करुन या मृत जनावरांची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावण्यात आली. दुर्गंधी पसरु नये म्हणून गॅमेग्झिंन पावडर फवारण्यात आली.

तसेच जाधववाडी येथील महाविरणच्या जंक्शन मधील पाणी काढण्यासाठी तसेच शहरातील अन्य ठिकाणच्या पाणी उपसा करण्यासाठी 30  पंप्स दिले आहेत. 4 डंपर, 15 ट्रॅक्टर, 4 जेसीबी या कामासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय टँकरद्वारे पीण्याचे पाणीही वाटण्यात आल्याचे ते म्हणाले.

अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स ग्रुपच्या माध्यमातून मृत जनावरांची शास्त्रीय विल्हेवाट लावण्याबाबत संदेश व्हॉटसॲपवर  पोस्ट करण्यात आल्याचे सांगून किशोर शहा म्हणाले, 3 ट्रक कोरडा चारा गोळा करुन शहर परिसरात तसेच आरे, वरणगे पाडळी, बस्तवाड आदी ठिकाणी पाठवण्यात आला आहे. आज अंबेवाडी रस्त्याकडेला आढळून आलेली मृत जनावरे जेसीबीने खड्डा खोदून ब्लिचिंग पावडर, कार्बोलिक ॲसिडच्या वापर करुन या मृत जनावरांची शास्त्रीय दृष्ट्या विल्हेवाट लावण्यात आली. दुर्गंधी पसरु नये म्हणून गॅमेग्झिंन पावडर फवारण्यात आली.

याबाबत पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी माहिती दिली. आजअखेर मृत 87 म्हैशी, 72 गायी, 19 वासरे आणि 51 शेळा-मेंढ्या यांची शास्त्रीय दृष्ट्या विल्हेवाट लावण्यात आली आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि शासनाच्या माध्यमातून ब्लिचिंग पावडर, कार्बोलिक ॲसिड, गॅमेग्झिंग पावडर पुरवण्यात आली आहे. गोठे धुण्यासाठी धुण्याचा सोडा, फिनेल आले असून त्याचे वाटपही सुरु करण्यात येत आहे. त्याचबरोबर आजरा येथील 3500, भुदरगडमधील 5800 आणि हातकणंगलेमध्ये 3281 कोंबड्यांची विल्हेवाटही संबंधित ग्रामस्थांनी लावली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा