कोल्हापूर सांगली महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून हवाईदलाचे सहाय्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 10 : कोल्हापूर आणि सांगली येथील अभूतपूर्व अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल, नौदल तटरक्षकदल यांनी जीवाची बाजी लावून पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठीचे विमाने व हेलीकॉपटर्स उतरवली आहेत.

हवाईदल किंवा नौदलामार्फत लष्करी विमाने उतरवण्याआधी कोणत्याही नव्या हवाईपट्टीचीं सुरक्षिततेच्या दृष्टीने निरिक्षण केले जाते. मात्र कोल्हापूर सांगलीच्या महापुरामुळे पूर्वनिरीक्षण अशक्य होते. त्यामुळे अशा पूर्व निरीक्षणाशिवाय या महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी नौदल, हवाईदल व कोस्ट गार्डच्या वैमानिकांनी धावपट्टीवर विमान आणि हेलीकॉप्टर उतरवले आहेत.  

महापुरामुळे कोल्हापूरचा संपर्क केवळ हवाईमार्गेच साधता येऊ शकत होता. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षणमंत्री श्री.राजनाथ सिंह यांना गंभीर परिस्थितीची जाणीव करुन देत हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाच्या सहायाची विनंती केली होती. त्यानुसार अत्यंत गतिने देशभरातील विविध ठिकानाहून मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री हवाई मार्गाने कोल्हापूर येथे पोहचवण्यात येत आहे. पावसामुळे हवामान खराब असताना अत्यंत कठीण अशा घटांना पार करत नव्या हवाईपट्टीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून भारतीय नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दलांनी अजोड अशी कामगिरी बजावली आहे.
      
गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर विमानतळावर हवाईदल, नौदल, तटरक्षक दलाची विमाने मदत साहित्य घेऊन पोचत आहेत. बुधवारी हवाईदल व नौदलाची 11 विमाने/हेलिकॉप्टर तर गुरुवारी 14 विमाने/हेलिकॉप्टर कोल्हापूर विमानतळावर उतरली होती. शुक्रवारी 16 वेळा विमाने/हेलीकॉप्टर्स या विमानतळावर उतरली आहेत.

या हेलिकॉप्टर विमानाने कोल्हापूर, कराड, सातारा व सांगलीमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाने गोवा, हुबळी, मुंबई, पुणे, भटींडा, भुवनेश्वर, विशाखापट्टणम येथून हवाई मार्गाने हेलिकॉप्टर व विमानातून विविध पथकांसह बोटी व इतर मदत सामग्री या दोन्ही जिल्ह्यांना पाठविली. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांची तातडीने सुटका करणे व मदत साहित्य पोहोचविणे शक्य झाले.

मुंबई येथील कलिना व लायन गेट वरुन सांगलीतील महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षा व सहाय्यासाठी 12 पथके ग्रीन कॉरिडॉर करुन अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत सांगलीला पाठवण्यात आले.

स्थानिक जिल्हा प्रशासन महाराष्ट्र पोलीस, एनडीआरएफ, महाराष्ट्र सुरक्षा दल सुध्दा नागरिकांच्या मदत आणि सहाय्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे.
0000

Risking lives, Air Force rescues marooned people in Kolhapur, Sangli
Mumbai, Aug 10: Risking lives, the rescue teams of Indian Air Force, Navy and Coast Guards landed airplanes and helicopters to rescue marooned people in unprecedented flood waters that engulfed Kolhapur and Sangli districts.
Prior security check of air strips or runways is conducted to see if they are safe for landing. But due to the unprecedented floods of Kolhapur and Sangli this was well nigh impossible. Hence without the prior checking, the brave pilots of Air Force, Navy and Coast Guards landed their planes and choppers on the runways for helping the marooned people.
 Contact with Kolhapur was possible only through airway. In consideration of this fact, Chief Minister Devendra Fadanvis contacted Union Defence Minister Rajnath Singh and informed him about the grave situation and appealed him to speed up rescue operations with the help of Air Force, navy and Coast Guard teams. Accordingly, necessary manpower and material from various locations in the country were rushed to Kolhapur by air. Overcoming the bad weather and incessant rains, the brave hearts of Air Force, Navy and Coast Guards have accomplished an unequalled responsibility.
Since last three days the planes of Air Force, Navy and Coast Guards are landing at Kolhapur air port with relief material. On Wednesday 11 Ir Force planes/helicopters and on Thursday 14 planes and helicopters landed at Kolhapur airport. ON Friday 16 sorties of relief material landed at this airport.
These coppers and airplanes have launched relief operations in Kolhapur, Karad, Satara and Sangli. The Air Force, Navy and Coast Guards have dispatched rescue teams with boats, and other relief materials from Goa, Hubli, Mumbai, Pune, Bhatinda, Bhubaneshwar, Vishakhapatanam by air for these two districts ravaged by the floods. This has facilitated conducting rescue and relief operations in these two districts.
12 teams are dispatched to Sangli from Kalina and Lion Gate of Mumbai by arranging ‘Green Corridor” for the rescue and relief operations in Sangli district.                                                                                                    

Besides, local district administration, Maharashtra Police, NDRF, Maharashtra Security Force are also working to rescue and provide relief to the marooned people in these districts

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा