मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकरांकडून मत्स्योद्योग महामंडळाचा १० लाखांचा धनादेश सुपुर्द

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 14: महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळाच्या वतीने पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  दहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज वर्षा या शासकीय निवासस्थानी सुपुर्द केला.


पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराने आतापर्यंत हजारो लोक बाधित झाले आहेत. त्यामुळे आता सर्वच स्तरातून येथील नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. प्रत्येक जण आपआपल्या परिने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशीच मदत मत्स्योद्योग महामंडळाच्या वतीने श्री. जानकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत ही रक्कम पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा