सांगली जिल्ह्यात दहा हजारपेक्षा अधिक पूरबाधितांची तपासणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतसांगली, दि. 13 : सांगली जिल्ह्यातील पूरबाधितांना वेळेवर उपचार होण्याची गरज असल्याकारणाने पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे तसेच मेडिकल कँपमध्ये 10 हजारपेक्षा अधिक पूरबाधितांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले.


यापैकी विविध ठिकाणच्या मेडिकल कॅम्पमध्ये एकूण 8 हजार 187 रुग्ण तपासले गेले. तर सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातील बाह्य रूग्ण विभागामध्ये 2 हजार 119 रुग्ण तपासण्यात आले. असे शासकीय वैद्यकीय पथकांकडून एकूण 10 हजार 306 रूग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी 175 रुग्ण दाखल झाले असून त्यामधील 84 रुग्णांवर ऑपरेशन करण्यात आले आहे. दोन रुग्ण गंभीर आहेत. तर 4 मृतदेह शवविच्छेदनासाठी आले आहेत. ही माहिती अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

डॉ. सापळे म्हणाल्या, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे आज वैद्यकीय शिबिरामध्ये 2 हजार 692 पूरबाधितांची तपासणी करण्यात आली. तर शासकीय रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात 408 पूरबाधितांची तपासणी करण्यात आली. दि. 12 ऑगस्ट रोजी 13 रुग्ण दाखल झालेले असून 23 शस्त्रक्रिया पार पडल्या.

0000

Health Checkup of  More Than Ten Thousand Flood Victims
 Sangli, 13: In view of  the need of timely treatment for flood victims in Sangli district,  more than 10 thousand flood affected people were given medical treatment in Padma Bhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli and Government Medical College, Miraj and also in medical camps. 
A total of 8,187 patients were examined in medical camps at various places.  2 thousand 119 patients were examined in the outpatient department of government hospitals in Sangli and Miraj.  In all 10 thousand 306 patients were given treatment by government medical teams.  Out of these, 175 patients were admitted and out of them surgery was performed on 84 patients .  The condition of two patients is critical  while 4 bodies have been brought for post mortem.  This information was given by  Dean Dr. Pallavi Saple.
Dr. Pallavi Sapale said, today 2,692 flood victims were examined in the medical camps at Padma Bhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli and  Government Medical College, Miraj .  In the outpatient department of the government hospital, 408 flood victims were examined.  On 12 August, 13 patients were admitted and surgery was perfomed on 23 patients.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा