गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत






मुंबई, दि. 14 : गणेशोत्सवाचे स्वरूप हे उत्साही राहिले पाहिजे. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

सार्वजनिक गणेशोत्सव काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री  ॲड. आशिष शेलार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र दहीबावकर, कार्याध्यक्ष कुंदन आगासकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयराज साळगावकर, सरकार्यवाह संजय सरनौबत आदी उपस्थित आहेत. समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सार्वजनिक उत्सव मंडळ आणि धर्मादाय संस्था, विश्वस्त मंडळाच्या नोंदणीसाठी अत्याधुनिक प्रणाली सुरू करण्यात येईल. पासपोर्टसाठी  ज्या पद्धतीने आता सुटसुटीतपणे आणि सहजपणे अर्ज, नोंदणी करता येते, त्याच पद्धतीने ही प्रक्रिया असेल. ऑनलाईन प्रणाली असल्याने कुठल्याही कार्यालयात हेलपाटे घालावे लागणार नाही. गणेशोत्सव समन्वय समिती आणि गणेशोत्सव महासंघाच्या सूचनांवर उचित निर्णय घेण्यात येईल.
  
पोलिसांनी आगमन व विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करावे. तसेच पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती भूमिका घ्यावी. गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी प्रयत्न करू, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

उत्सव काळात गणेशोत्सव मंडळांनी स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर द्यावा, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री श्री. शेलार यांनी यावेळी केली. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत रात्री दहानंतर पारंपरिक वाद्यांना  परवानी देण्याची मागणी पुण्यातील मंडळांनी केली असल्याची माहिती श्री. भेगडे यांनी दिली.

यावेळी श्री. दहिबावकर व श्री. साळगावकर यांनी गणेश मंडळाच्या वतीने विविध सूचना केल्या.
०००००


गणेश मंडलों का ऑनलाईन पंजीयन
गणेश उत्सव शांतिपूर्ण और उत्साहपूर्ण
वातावरण में मनाने के लिए नियोजन करें
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : गणेशोत्सव का स्वरूप उत्साहपूर्ण रहना चाहिए. गणेश उत्सव शांतिपूर्ण और उत्साहपूर्वक मनाने के लिए एकत्रित आकर प्रयास करें. गणेश मंडलों द्वारा ऑनलाईन पद्धति से पंजीयन करने तथा कानून सुव्यवस्था की दृष्टि से उचित नियोजन करने के निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस में दिए. 
सार्वजनिक गणेश उत्सव के दौरान राज्य में कानून और सुव्यवस्था के संदर्भ में मुख्यमंत्री श्री. फडणवीस की अध्यक्षता में आज सह्याद्री अतिथिगृह में बैठक हुई. समन्वय समिति की ओर से निकाली गई सूचना पुस्तिका का विमोचन मुख्यमंत्री के हाथों हुआ. 
मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने कहा, सार्वजनिक उत्सव मंडल और धर्मादाय संस्था, विश्वस्त मंडल के पंजीयन के लिए अत्याधुनिक प्रणाली शुरू की जाएगी. पासपोर्ट के लिए जिस तरह आसान और सहजता से आवेदन, पंजीयन किया जाता है उसी तरह यह प्रक्रिया रहेगी.  ऑनलाईन प्रणाली के कारण किसी भी कार्यालय में जाने की आवश्यकता नहीं है.  गणेशोत्सव समन्वय समिति और गणेशोत्सव महासंघ द्वारा सुझाई गई सूचनाओं  पर उचित निर्णय लिया जाएगा. 
पुलिस विभाग द्वारा आगमन और विसर्जन की रैली में यातायात का नियोजन करने तथा पारंपरिक वाद्यों को अनुमति देने के संदर्भ में पुलिस द्वारा उचित भूमिका लेने और गणेशोत्सव के दौरान ज्यादा से ज्यादा बारह बजे तक ध्वनिवर्धकों को अनुमति देने के लिए प्रयास करेंगे, ऐसा भी श्री फडणवीस ने कहा.
उत्सव के समय में गणेशोत्सव मंडलों द्वारा स्वच्छता पर अधिकाधिक जोर देने की सूचना शालेय शिक्षण मंत्री श्री. शेलार ने इस समय दी. गणेशोत्सव विसर्जन रैली में रात 10 बजे के बाद पारंपरिक वाद्यों को अनुमति देने की मांग पुणे के मंडलों द्वारा किए जाने की जानकारी श्री. भेगडे ने दी. इस समय य श्री. दहिबावकर और श्री. सालगावकर ने गणेश मंडल की ओर से कुछ सूचनाएं रखी.
इस समय उच्च एवं तकनीकी शिक्षा मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटिल, राज्यमंत्री संजय ऊर्फ बाला भेगडे, विधायक मंगलप्रभात लोढा, मुंबई के महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुणे की महापौर मुक्ता टिलक, अपर मुख्य सचिव संजय कुमार, पुलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पुलिस आयुक्त संजय बर्वे के साथ वरिष्ठ पुलिस अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिति के अध्यक्ष ॲड. नरेंद्र दहीबावकर, कार्याध्यक्ष कुंदन आगासकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघ के अध्यक्ष जयंत सालगावकर, सरकार्यवाह संजय सरनौबत आदि उपस्थित थे.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा