कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना रोख सानुग्रह अनुदान वाटपास प्रारंभ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कोल्हापूर, दि. 13 :  जिल्ह्यातील पूरग्रस्तांना द्यावयाच्या मदतीपैकी 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान आज विविध ठिकाणी रोख स्वरुपात पूरग्रस्तांना देण्याची कार्यवाही गतिमान केली आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान प्राधान्याने देण्यासाठी यंत्रणा गतिमान केली आहे. यामध्ये प्रामुख्याने साबळेवाडी येथील 43 स्थलांतरीत कुटुंबाना, खुपीरे शिंदेवाडी येथील 76 स्थलांतरीत लाभार्थींना प्रशासनाच्यावतीने सानुग्रह अनुदान देण्यात आले. आजरा तालुक्यातील मौजे इटे येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या केशव बाळु पाटील यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यात आले.

तसेच पूरग्रस्तांसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या संक्रमण शिबीराच्या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांना दररोज माणसी 60 रुपये तर लहान मुलांना 45 रुपयांचे अनुदान रोख स्वरुपात देण्याचे कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा