स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी श्री. शेलार आणि आमदार तृप्ती सावंत यांच्या हस्ते जितेंद्र शर्मा, पूजा पांडे व डॉ.योगेश दुबे यांना सन 2016-17 चे जिल्हा युवा पुरस्कार तर  आशुतोष पांडे,  अपुर्वा वेल्हाळकर व राधा दळवी यांना 2017-18 चे जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. लघु उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबाबत मे.निल बिव्हरेजेस प्रा.लि. अंधेरी आणि मे.हर्ष प्रेसिअस मेटलन्स प्रा.लि. गोरेगाव या कंपनीच्या उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  मुंबई उपनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. यानंतर श्री. शेलार, आमदार तृप्ती सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस उप आयुक्त मंजुनाथ सिंगे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा